वसतीगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघून गेले, विद्यापीठाची नाचक्की..

विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहाच्या उद्घाटनाचा प्रमुख कार्यक्रम असतांना राज्यपालांनी तोच रद्द केल्याने नांदेडकरांचा हिरमोड झाला आहे.
वसतीगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघून गेले, विद्यापीठाची नाचक्की..
Governor Bhgatsingh Koshiyari news Nanded

नांदेड ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड दौरा आज सुरू झाला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन , गुरद्वारा भेट व अधिकाऱ्यांची बैठक असा त्यांचा आज भरगच्च कार्यक्रम होता. (The Governor left without inaugurating the dormitory,  university upset) विद्यापीठातील वसतीगृहाची पाहणी राज्यपालांनी केली मात्र उद्घाटन न करतात ते तिथून निघून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विद्यापीठाने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती, मात्र राज्यपालांनी उद्घाटन सोहळाच रद्द केल्याने विद्यापीठाची नाचक्की झाल्याचे बोलले जाते. (Governor Bhgatsingh Koshyari Cancel inogration nanded Univercity) दरम्यान हा उद्घाटन सोहळा रद्द करून राज्यपाल थेट गुरुद्वारात दर्शनासाठी निघून गेले. त्यामुळे प्रशासनाची देखील चांगलीच तारंबळ होत आहे.

राज्यपाल कोश्यारी यांचा मराठवाडा दौऱ्याबद्दल चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने तर या दौऱ्यावर अघोषित बहिष्कार टाकल्याचेच चित्र आहे. त्यातच राज्यपालांकडून देखील नियोजित दौऱ्यात अचानक बदल केले जात असल्याने प्रशासन देखील हादरले आहे. विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहाच्या उद्घाटनाचा प्रमुख कार्यक्रम असतांना राज्यपालांनी तोच रद्द केल्याने नांदेडकरांचा हिरमोड झाला आहे.

गेस्टहाऊसवर घेणार अधिकाऱ्यांची बैठक..

विद्यापीठाने या सोहळ्यासाठी घेतलेली मेहनत मात्र राज्यपालांच्या लहरीपणामुळे वाया गेली असेच म्हणावे लागेल. सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात या कार्यकर्माची लगबग सुरू होती. प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. मात्र राज्यपालांनी उद्घाटन सोहळा रद्द करून थेट आपला मोर्चा गुरूद्वाराकडे वळवल्याने यंत्रणेची धावपळ झाली.

गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी हे शासकीय विश्रामगृहातच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते विविध प्रश्नांचा आढावा घेणार असल्याचे समजते. त्यानंतर आज नांदेडातच मुक्काम करून ते उद्या परभणीकडे रवाना होणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in