जयंत पाटलांची मोठी घोषणा : खोपोलीत स्वबळावर लढणार 

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी बनली.
Khopoli municipality elections will be fought on its own : Jayant Patil
Khopoli municipality elections will be fought on its own : Jayant Patil

खोपोली  : खोपोली नगरपालिकेत दहा नगरसेवक असतानाही मागील निवडणुकीत आघाडी धर्म पाळण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. शेकापच्या मतांमुळेच नगराध्यक्षा विजयी झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी बनली. परंतु सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने शेकापला मागील साडेचार वर्षे दुय्यम वागणूक दिली तसेच कारभारात चुकीची धोरणे राबवली, हा अनुभव घेतल्यानंतर खोपोली नगरपालिकेची आगामी निवडणूक शेकाप स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. (Khopoli municipality elections will be fought on its own : Jayant Patil)

मागील साडेचार वर्षांत खोपोली शहरात अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. देशात पुरोगामी विचार मजबूत होण्यासाठी आणि भाजपला विरोध करण्यासाठी आम्ही आघाडीत आहोत. मात्र, खोपोली नगरपालिकेसह रायगड जिल्ह्यातील अन्य निवडणुका आघाडीऐवजी शेकापने स्वबळावर लढविण्याची मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे ही पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या वेळी शेकपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागत पाटील यांनी केले. 

याप्रसंगी जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, ज्येष्ठ नेते संतोष जंगम, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे, नगरसेवक दिलीप जाधव, अरुण पुरी, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, संजय पाटील, आनंद नायडू, श्याम कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ साठेलकर यांनी केले.
 
अपेक्षित विकास झाला नाही

खोपोली नगरपालिका श्रीमंत पालिका असताना ज्या पद्धतीने विकास करायला हवा होता, तो झालेला नाही. अलिबाग आणि खालापूर नगरपंचायत शेकापच्या ताब्यात असून कोणतीही पाणीपट्टी, घरपट्टीत वाढ केलेली नाही. अतिक्रमण हटविताना वाद कोर्टात न नेता समोपचाराने मिटवून रस्ते वाढविले असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. खोपोली शहरात आंबेडकरी विचारांचा समाज मोठ्या प्रमाणात आहे. तो एकत्रित नाही, हे दुर्दैव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खोपोलीसाठी दहा लाखांचे वैद्यकीय साहित्य दिले

शेकाप छत्तीशी विभागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे . त्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार आहे. केटीएसपी ही शैक्षणिक संस्था कर्जामुळे बंद पडणार होती. साडेचार कोटी कर्ज काढून शिक्षण संस्था चालू ठेवत सर्व पक्षीय पदाधिकारी सदस्य म्हणून काम करीत आहेत. कोरोना काळात शेकापने दहा लाखांचे वैद्यकीय साहित्य खोपोलीसाठी उपलब्ध करून दिले आहे, असे जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com