अविनाश भोसलेंना मोठा दणका; कंपनीच्या मुख्यालयावर 'ईडी'ची टाच

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना सक्त वसुली संचालनालयानेमोठा दणका दिला आहे.
ed confiscates property of builder avinash bhosale in pune
ed confiscates property of builder avinash bhosale in pune

पुणे : पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. भोसले यांची चार कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या  मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली आहे. राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

याआधीही अविनाश भोसले यांची कोट्यवधींची मालमता ईडीने जप्त केली होती. ईडीने 21 जूनला भोसलेंची 40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसले यांची चौकशी सुरू होती. कर चुकवेगिरीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबई येथील मालमत्तांवरही छापेही टाकले होते. 

भोसले यांची ईडीने ११ फेब्रुवारी रोजी तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. परकीय चलनाविषयीच्या `फेमा` कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आली होती.  भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते. ईडीच्या नजरेत त्यांचे कोणते व्यवहार आले, याचा खुलासा नंतरच होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या कंपनीचे पुण्यात मुख्यालय आहे. तेथे ईडीने छापा मारला होता. पुण्यात कधी काळी रिक्षा चालविणारे अनिनाश भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात. मात्र, आता त्यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.  

ईडीने नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि चौकशीसाठी बजावलेल्या समन्सच्या विरोधात भोसले यांनी मुंबई उच्च न्यायलयात देखील धाव घेतली होती. सुनावणीमध्ये न्यायालयाने भोसले यांना कोणतीही सवलत दिली नव्हती. पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवर्तक एबीआयएल समूह लोकप्रिय आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com