शिवसेनेतील वाद पेटला : बाळासाहेबांची प्रतिमा असलेले बॅनर फाडले

तीचूक काही लोकांकडून करण्यात आली आहे, त्यांच्यावरयोग्य ती कठोर कारवाई व्हावी.
Balasaheb's banner was torn down in Palghar due to internal dispute of Shiv Sena
Balasaheb's banner was torn down in Palghar due to internal dispute of Shiv Sena

सफाळे (जि. पालघर) : पालघर जिल्ह्यातील  फ्रेडून फार्म या कंपनीतील शिवसेनेच्या दोन युनियनमधील नेत्यांच्या वादात शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेले बॅनर फाडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या गोष्टीचा शिवसैनिकांनी निषेध केला असून बॅनर फाडणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी पालघर पोलिस ठाण्यात केली आहे. (Balasaheb's banner was torn down in Palghar due to internal dispute of Shiv Sena)

फ्रेडून फार्मा कंपनीत शिवसेनेची एक युनियन गेली अनेक दिवस कार्यरत होती. कामगाराकडे ही युनियन लक्ष देत नसल्याने कामगारांनी शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या युनियनमध्ये प्रवेश करत पहिल्या युनियनला सोडचिठ्ठी दिली. या वादातून नव्याने स्थापन झालेल्या युनियनचा बोर्ड त्यावर असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र अज्ञात इसमांनी बुधवारी (ता. ४ ऑगस्ट) रात्री फाडून टाकून दिले. 

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालघरमधील शिवसैनिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आपापसांतील वादामुळे कोणीही बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेला बॅनर फाडण्याची चूक करू नये, ती काही लोकांकडून करण्यात आली आहे, त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई  व्हावी, अशी आमची भूमिका आहे, असे वैभव संखे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : गटारीनिमित्त शिवसेनेची विशेष ऑफर; व्हायरल फलकाची जोरदार चर्चा 


विरार : येत्या रविवारी (ता. ८ ऑगस्ट) येणाऱ्या दर्श अमावस्या, दीपपूजा (तळीरामांच्या दृष्टीने गटारी अमावस्या) निमित्त विरार येथील शिवसेनेच्या साईनाथ नगर शाखेच्या वतीने अल्प दरात एक किलो चिकन वाटप करण्यात येणार आहे. चिकन वाटपाविषयीचा फलक सोशल मिडीयावर वायरल झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

वायरल झालेल्या फलकामध्ये चिकन मिळविण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच, रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेतच चिकन घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या फलकावर चिकनचा दर १८० रुपये जाहीर केला आहे. बाजारात सध्या चिकनचा दर २३० ते २४० रुपये आहे. शिवसेनेतर्फे प्रतिव्यक्ती एक किलो चिकन अल्पदरात देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या या अल्प दरातील चिकन वाटपात आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीची गणिते दडली असल्याची चर्चा आहे. तर काही ठिकाणी शिवसेनेच्या या चिकन वाटपाचे हसे देखील होत आहे. आवश्यक कामे सोडून शिवसेना नको ते उपक्रम राबवून नागरिकांना रिजवू पाहत असल्याची टीकाही होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com