मुळशीच्या सभापतीचा जमीनलुटीचा `मुळशी पॅटर्न`; मालकाच्या कानाला लावले रिव्हाॅल्वर - Mulshi Pattern thrill; landlord beaten with Revolver; Pune politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मुळशीच्या सभापतीचा जमीनलुटीचा `मुळशी पॅटर्न`; मालकाच्या कानाला लावले रिव्हाॅल्वर

उत्तम कुटे
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

जमिनीला सोन्याचा भाव आलेल्या मुळशी (जि.पुणे) तालुक्यातील  भाईगिरीच्या जोरावर जमीनी हडपण्यावरील प्रवीण तरडे यांचा सुपरहिट सिनेमा `मुळशी पॅटर्न`मधील थरार मुळशी तालुक्यातच माण, हिंजवडीत पहायला मिळाला.
 

पिंपरीः जमिनीला सोन्याचा भाव आलेल्या मुळशी (Land had gold`s rate in Mulshi) तालुक्यातील (जि.पुणे) भाईगिरी व त्या जोरावर जमीनी हडपण्यावरील (mulshi pattern movie based on Gundaism and land mafia) प्रवीण तरडे यांचा सुपरहिट मराठी सिनेमा मुळशी पॅटर्नमधील थरार मुळशी तालुक्यातच या माण, हिंजवडीत बुधवारी (ता.४) पहायला मिळाला. (Today people witness the movie`s horror at Man- Hinjwadi)  मुळशीचे पंचायत समिती सभापती पांडुरंग मारुती ओझरकर (Pandurang Ozarkar & his colleagues) व त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ शेतकरी, त्याचा मुलगा आणि भाच्याला रिव्हॉल्वरच्या धाकाने शिवीगाळ करीत मारहाण केली.

या घटनेनंतर ओझरकर फरार झाला आहे. मात्र, हिंजवडी पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. त्यांना ९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला, अशी माहिती तपासाधिकारी रविंद्र मुदळ यांनी `सरकारनामा`ला दिली. 

यासंदर्भात रामनारायण एकनाथ पारखी (वय ६३, रा. माण, ता. मुळशी) या शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यांनी ओझरकर हा राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने सांगत त्याला लगेचच अटक होईल की नाही, याविषयी शंका व्यक्त केली आहे. मात्र,तपासाधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. नितीन बाळू कुंटे (वय २५, रा. चांदे, ता.  मुळशी), रोशन बाळकृष्ण ओझरकर (वय २८, रा. ओझऱकरवाडी, माण, ता. मुळशी) आणि नवनाथ आनंदा गवारे (वय ३८, रा. गवारे मळा, माण) अशी अटक आऱोपींची नावे आहेत. सभापतीसह यशवंत गवारे, रामदास गवारे, गणेश शिंदे हे फरारी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारखी यांनी माणमध्ये पाच एकर जमीन आहे. त्यातील तीन एकर `एमआय़डीसी`ने आरक्षित केली आहे. उर्वरित दोन एकर जमीन ही पारखी व त्यांचे सख्खे चुलत भाऊ यांच्या नावे आहे. त्यातून माण ग्रामपंचायतीने गटार व रस्त्याचे काम एस. के. एंटरप्रायजेस या आपल्या ठेकेदारामार्फत सुरु केले. या कामामुळे गटाराचे पाणी घरासमोर येणार असल्याने पारखींनी आक्षेप घेतला. त्यामुळे पावसाळ्यानंतर त्यावर निर्णय घेण्याचे ठरले होते.

त्यानंतरही ओझरकर हे काल दुपारी आपल्या साथीदारांसह तिथे आले. ओझरकरने रिव्हॉल्वरच्या धाकाने शिवीगाळ केली. नंतर सिमेंट ब्लॉकने पारखींचा पुतण्या सूरज याला जखमी केले.त्यांचा मुलगा विश्वासलाही या टोळक्याने मारहाण केली. दगडांनीही त्यांनी हल्ला केला. एवढेच नाही, तर मोटारी आडव्या लावून पारखींचा रस्ता बंद करीत त्यांना शिवीगाळ व मारहाण करून ते निघून गेले.
...
हेही वाचा...

असंघटीतांपर्यंत शासकीय मदत पोहोचवा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख