आम्ही 75 वर्ष घरात लहान मुलांना दूध पाजत बसलो नव्हतो!

सोमय्या यांच्या टिकेला भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.
Chaggan Bhujbal slams Kirit somaiya over allegations
Chaggan Bhujbal slams Kirit somaiya over allegations

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीप्रमाणे भुजबळ यांनी काम केले आहे.  120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय?, असं सोमय्या म्हणाले आहेत. (Chaggan Bhujbal slams Kirit somaiya over allegations)

सोमय्या यांच्या टिकेला भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले, किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे मागील चार-पाच वर्षांपूर्वीचे असून ते शिळ्या कडीला ऊत आणत आहेत. सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. सोमय्या या प्रकरणांवर दबाव टाकण्याचा  प्रयत्न करत आहेत का, असं वाटतं. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आमचा न्यायालयात लढा सुरू आहे. सोमय्या यांच्या आरोपांत काडीचंही सत्य नाही. 

आम्ही पंचात्तर वर्षं घरात लहान मुलांना दूध पाजत बसलो नव्हतो, असं म्हणत भुजबळ यांनी सोमय्यांवर पलटवार केला. आम्ही त्यावेळेसही मालमत्ता कमी दराने खरेदी केल्या होत्या, ही मीडिया ट्रायल आपण थांबवली पाहिजे. सर्व प्रकरणात न्यायालयात आम्ही लढत असून वारेमाप आरोप करणं हे त्यांचं काम आहे, असं भूजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान, सोमय्या हे बुधवारी नाशिक दैाऱ्यावर होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी बोलत होते. त्यांनी भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. सोमय्या म्हणाले की, भुजबळ यांनी आपल्या संपत्तीचे मालक कोण हे स्पष्ट करून माहिती द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना चुकीचे काम केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बाहेर काढावे. अतिशय चुकीच्या पद्धतीप्रमाणे भुजबळ यांनी काम केले आहे.  120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

आज मी त्यांच्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला हे देखील त्यांनी स्पष्ट करावे. या कंपनीमध्ये भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला आहे. शनिवारी मी भुजबळांच्या मुंबईतील घराची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. 

परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत,'' असा आरोप सोमय्या यांनी केला.  ''भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा,'' अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com