राहुल गांधींनी GDP चं केलं नामांतर; मोदी सरकारनं यातून कमावले 23 लाख कोटी

मोदींची धोरण पोकळ आहेत. ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करू शकत नसल्याने मोदी घाबरले आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
Rahul Gandhi criticizes govt says GDP means Gas Diesel Petrol
Rahul Gandhi criticizes govt says GDP means Gas Diesel Petrol

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून नुकतंच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर केलं. त्यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मागील सात वर्षांत सरकारकडून अनेक संस्था, योजनांची नावे बदलली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही बुधवारी थेट GDP चं नामांतर केलं. काही महिन्यांपासून सातत्यानं इंधनाचे दर वाढत आहेत. तर केंद्र सरकारनं देशाचा GDP वाढल्याचा दावा केला आहे. (Rahul Gandhi criticizes govt says GDP means Gas Diesel Petrol)

राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशाचा GDP वाढल्याचा दावा सरकारकडून करण्यात आल्यानंतर त्याचा संदर्भ राहुल यांनी थेट त्याचं नामांतर केलं. गॅस, डिझेल, पेट्रोल (GDP) असं नाव राहुल यांनी दिलं आहे. प्रत्यक्षात GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट). कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे हे एक मापक आहे. देशानं त्यावर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत म्हणजे त्या देशाचा GDP होय.

देशातील वाढत्या इंधन दरावरून राहुल म्हणाले, देशाचा GDP म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यातून केंद्र सरकारनं 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हा पैसा कुठे गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मागील सात वर्षात आपण एक मोठा आर्थिक बदल पाहिला आहे. डिमोनेटायजेशन ते मोनेटायजेशन हे दोन्ही एकत्र होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार-पाच मित्रांचे मोनटायजेशन होत आहे. तर शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, नोकरदार, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपतींचे डिमोनेटायजेशन होत आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

इंधनाचे दर वाढले की त्याचा थेट फटका सर्वसामान्य लोकांना बसण्यास सुरूवात होते. लोकांच्या आर्थिक गणित कोलमडतं. वाहतुकीचा खर्च वाढल्यानं महागाई वाढते. तसेच अनेक गोष्टींवर अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे लोकांवर महागाईचा बोजा वाढतच जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी होत आहेत आणि देशात वाढत आहेत. देशात 1991 सारखी स्थिती आली आहे. व्हिजन  बदलल्या शिवाय  आपण  यातून  बाहेर  पडू शकत नाही. 1991 ते युपीए सरकार असेपर्यंत आमच्या धोरणानुसार सुरू होतं. पण मोदींची धोरण पोकळ आहेत. ज्या  घोषणा केल्या त्या पूर्ण करू शकत नसल्याने मोदी घाबरले आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून युपीए सरकारवर निशाणा साधल्याची आठवण करून देत राहुल गांधी म्हणाले, 2014 मध्ये युपीएचं सरकार गेलं त्यावेळी गॅस सिलेंडरचा दर 410 रुपये होता. आता हा दर 885 रुपयांवर गेला आहे. गॅसच्या दरात 116 टक्क्यांनी वाढ झालीय. तर पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 42 टक्के व 55 टक्के वाढले आहेत. 2014 मध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 71.5 रुपये तर डिझेलचे दर 57 रुपये होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com