मुख्याध्यापकांनी धुलाई केली आणि नितीन गडकरींनी ठरवलं....

तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे भाषण देण्याची, तुझ्यात तेही नाही.
The headmaster punished and Nitin Gadkari decided to learn speech
The headmaster punished and Nitin Gadkari decided to learn speech

नागपूर : मी ज्यावेळी शाळेत होतो, त्यावेळी स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता आणि मुलं-मुली भाषण देत होते. आम्ही तसं टवाळखोर मुलांमध्येच जास्त होतो. एक मुलगी भाषण करताना अडखळत होती. ती इंग्लिशमध्ये बोलत होती. ती ‘नेचर’ला ‘नट्रू’ म्हणाली आणि आम्ही तिची मजा करण्यासाठी मागून तिला चिडवत होतो. हे मुख्याध्यापकांनी पाहिले आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेऊन चांगलीच धुलाई केली. त्याचवेळी ठरवलं की आपणही भाषण करून दाखवायचं, अशी आठवण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षकदिनानिमित्त सांगितली. (The headmaster punished and Nitin Gadkari decided to learn speech)

शिक्षकदिनानिमित नागपूरमधील साऊथ पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात गडकरी बोलत होते. या वेळी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, त्या मुलीची थट्टा केल्यामुळे मुख्याध्यापकांनी आमची धुलाई केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की तिच्यामध्ये डेअरिंग तरी आहे भाषण देण्याची, तुझ्यात तेही नाही. तरीही तू तिची थट्टा करतो. त्यांनी दिलेल्या मारामुळे माझ्या मनात निगेटिव्ह इच्छाशक्ती तयार झाली आणि ठरवलं की आपणही भाषण करून दाखवायचं. मी भाषण करायला सुरूवात केली. जर त्यावेळी मुख्याध्यापकांनी मला मारलं नसतं किंवा आपला अपमान झाला आहे, असं वाटलं नसतं तर कदाचित मी कधीच भाषण करायला सुरूवात केली नसती

‘‘सुरुवातीला मी मराठीत, त्यानंतर हिंदीत भाषण द्यायला सुरुवात केली. पण, इंग्रजीमध्ये भाषण कसं करायचं, ही अडचण होती. त्यानंतर मात्र, आपल्यासमोर सर्व मूर्ख बसलेले आहेत, त्यांना काही कळत नाही, असे समजून आपण भाषण द्यायचं ठरवलं. त्यातून मी इंग्रजीमधून भाषण द्यायला लागलो. कोविड काळात ९५० व्हिडिओ कॉन्फरस केले. मी मीडियासेव्ही नाही. माझं आयुष्य शिस्तीतील नाही. पण, आता शिस्तीत आलं आहे. तुमचा निग्रह असेल तर तुम्ही शिकू शकता,’’ असे गडकरी यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, संस्थेचे मूल्यमापन हे संचालक आणि शिक्षकांवर होते. ते कोणत्या गुणवत्तेचे आहेत, त्यावर संस्थेचे भविष्य अवलंबून असते. भविष्यातील नागरिक शिक्षणाच्या संस्कारातून घडतो. आपले जीवन घडविणारे आपले शिक्षक आहेत, त्यांच्यामुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तमरित्या घडविले तर आपण नक्कीच आत्मनिर्भर भारत म्हणजेच, शक्तीशाली, समृद्ध भारत घडवू. व्यक्तींचा समूह समाज असतो.

शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापक हा शैक्षणिक परिवार आहे. या परिवाराच्या सहकार्यातून ही बालके उद्या मोठी होणार आहेत. मूल्याधिष्ठ शिक्षणपद्धती ही आपल्या समाज जीवनाची मोठी विशेषतः आहे. ज्येष्ठ नागरिकांना मान दिला पाहिजे. खरं बोललं पाहिजे. ही मूल्ये ही भारतीय समाजाची शक्ती आहे. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून देणे, हा मोठा संस्कार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com