स्वाभिमानीचे संस्थापक राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधण्याचे काम वेगात सुरू केले आहे.
स्वाभिमानीचे संस्थापक राष्ट्रवादीत प्रवेश करणार 
Bharat Patil of Swabhimani Vikas Aghadi will join NCP

आटपाडी (जि. सांगली) : स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील आज (ता. ५ सप्टेंबर) यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सावित्री देवी कॉटन मिलवर कार्यक्रम होणार आहे. (Bharat Patil of Swabhimani Vikas Aghadi will join NCP)

आटपाडीचे माजी सरपंच तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य (कै.) रामभाऊ पाटील हे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते होते. तथापि त्यांचे बंधू भारत पाटील मात्र स्वतंत्र स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून समाज कार्यात सक्रिय होते. पक्षाचा झेंडा हातात न घेता त्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधण्याचे काम वेगात सुरू केले आहे. आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे. त्याची मोट बांधण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर असताना शिवसेनेचे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. जयंत पाटील यांनी रविवारी रात्री अनिल बाबर यांना ‘तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी करेक्ट फिल्डिंग लावावी लागत आहे’, असे म्हटले. त्याआधी आमदार बाबर आणि त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांनी जयंत पाटील यांना ‘खानापूर विधानसभा मतदार संघात तुम्ही फार लक्ष घालणार असल्याचे समजते. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याऐवजी या भागात टेंभूचे पाणी देऊन दुष्काळाचा कार्यक्रम करा’, असे साकडे घातले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in