मंत्री म्हणून मी मुंबईला मिरवायला किंवा फोटोसेशनसाठी जात नाही

त्यांच्या १९ वर्षांच्या कार्याचा अहवाल घ्यावा लागेल.
Indapur taluka water problem will be solved permanently: Dattatreya Bharane
Indapur taluka water problem will be solved permanently: Dattatreya Bharane

इंदापूर (जि. पुणे) : तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा आमदार झालो. राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मला मंत्री केले. मंत्री म्हणून मी मुंबईस मिरवण्यासाठी किंवा फोटोसेशनसाठी जात नाही, तर जनसेवेसाठी जातो. आता आमदारकीची सव्वातीन वर्षे राहिली असून इंदापूर तालुक्यातील लाकडी, निंबोडी परिसर तसेच २२ गावांचा पाण्याचा दुष्काळ संपवून तालुक्याचा पुढील १०० वर्षांचा विचार करून विकास करणार आहे, असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले. (Indapur taluka water problem will be solved permanently: Dattatreya Bharane)

इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने इंदापूर येथे आयोजित युवक मेळाव्यात मंत्री भरणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, प्रताप पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक तालुकाध्यक्ष ऍड शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष विशाल मारकड, तालुका उपाध्यक्ष अक्षय कोकाटे, दिलीप वाघमारे, सागर मिसाळ उपस्थित होते. 

ज्यांनी काही काम केले नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. त्यांच्या १९ वर्षांच्या कार्याचा अहवाल घ्यावा लागेल, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.

मंत्री भरणे म्हणाले, युवकांची ताकद निवडणुकीत समजते. जिकडे युवक जास्त, तिकडे विजय ठरलेला आहे. त्यामुळे युवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही निधीची काळजी करू नका, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हास निधी दिला जाईल. तालुक्यात रस्त्याची कामे झाली असून आता महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणे तसेच तालुक्याचा पाणीप्रश्न संपविणे यास प्राधान्य दिले जाईल. नीरा नदी कोरडी पडत असल्याने नवीन धरणासाठी कुठे जागा आहे का याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे गावातील गटतट, ग्रामपंचायत, सोसायटी, वैयक्तिक हेवेदावे बाजूस ठेवा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकीचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे.
 
हेही वाचा : शिवसेना आमदार दिलीप मोहितेंचा राजकीय सूड घेईल 

राष्ट्रवादी जोडो अभियानाअंतर्गत विरोधी पक्षातील अनेक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, इंदापूर नगरपरिषद, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जुन्या, नव्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही भरणे यांनी केले.
 
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, युवकांनी आपले व्यासपीठ तयार करून प्रशासनावर अंकुश ठेवला पाहिजे. कारण सत्तेस काम करण्यास मर्यादा असते. मात्र संघटना सर्वकाही करू शकते. त्यामुळे पक्षाने युवकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक नामी संधी दिली आहे. या संधीचे सोनं करून युवकांनी समाजहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. 

युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेखम्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये काम करत असताना पक्ष निष्ठा ठेवून काम केल्यास पक्ष त्याची निश्चित दखल घेतो. यातूनच उद्याचा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात मागील १९ वर्षात जी कामे झाली नाहीत, ती केवळ १९ महिन्यांत झाली आहेत. पक्षप्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूरकडे विशेष लक्ष असून मंत्री भरणे यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी त्यांना ५० हजार हून जास्त मताधिक्यांनी निवडून आणण्याचे नियोजन करावे. त्यासाठी गाव तिथे राष्ट्रवादी व वाड्या वस्त्या तिथे बूथ कमिटी सक्षम करणे गरजेचे आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवकअध्यक्ष शुभम निंबाळकर म्हणाले, ताई दादा सप्ताहाच्या माध्यमातून रक्तदान, वृक्षारोपण, कोविड केअर केंद्र, कोरोना योद्धा पुरस्कार, लसी करण, राजस्व अभियान आदी उपक्रम राबविले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com