स्वर्गवासी भैय्यांविषयी कोणी वापरले अपशब्द? मारहाण झालेला कार्यकर्ता काय सांगतोय

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या एका नगरसेवकाच्या नेतेवाईकाला नगरमध्ये एका हाॅटेलवर रात्री मारहाण झाली. त्याचा याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Shivsena.jpg
Shivsena.jpg

नगर ः भैय्यांविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचा (Shivsena) एक कार्यकर्ता अधिक चिडला, असे तो व्हिडिओतून सांगत आहे. शिवसेनेतील दोन गटांतील वाद या वाक्यामुळे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. (Who used insults about brothers? What is the beaten worker saying?)

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या एका नगरसेवकाच्या नेतेवाईकाला नगरमध्ये एका हाॅटेलवर रात्री मारहाण झाली. त्याचा याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ``मी महापौरपदाची माघार घेतली होती. तरीही काहींनी मला हाणले. स्वर्गवासी आपले भैय्या यांना अपशब्द वापरले, म्हणून मी काच फोडली. त्यांनी मला खूप मारले. मला दारु पाजून मारले.``

भैय्यांबाबत नेमका कोण बोलले, काय बोलले, याची चाचपणी आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतून होत आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील दोन गटांमधील वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. आज महापौरपदाच्या निवडीच्या वेळीही दुसऱ्या गटातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नव्हते. सभाच आॅनलाईन असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, असे कारण दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात दोन गटातील वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचा महापौर झाला आहे. यापूर्वी भाजप व शिवसेना यांची युती होती. त्यामुळे सर्व निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्रीत लढत होते. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान यांच्यात झालेल्या दुहीमुळे नगरमध्येही समिकरणे बदलली. भाजपने एकट्याने लढून महापालिकेत चांगल्या जागा मिळविल्या. त्याच्याच जोरावर राष्ट्रवादीच्या जोरावर महापौरपदही मिळविले होते. त्या वेळी शिवसेनेला एकटे पाडले होते. राज्यात महाविकास आघाडीमुळे आता शिवसेना व काॅंग्रेस मित्र पक्ष असल्याने प्रथमच राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेला महापौरपद मिळाले आहे.

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com