आधी दारु पाजली, नंतर हाणमार केली ! नगरमध्ये का झाला शिवसेनेत राडा

काल रात्री एकाहाॅटेलवर इतर दोनपैकीएका नगरसेवकाच्या नातेवाईकाला दारु पाजून त्याला मारहाण केल्याची त्याची तक्रार आहे. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
maramari.jpg
maramari.jpg

नगर : महापौर निवडणुकीचे सोपस्कर आज दुपारी पार पडले. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendge), तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांची निवड झाली. आजच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील दोन गटांत रात्री जोरदार हाणामारी झाली. त्यातील एका नगरसेवकाच्या नातेवाईकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, आधी त्यांनी दारु पाजली, नंतर खूप मारले, असे तो म्हणतो आहे. या प्रकाराने शिवसेनेतील दुही पुन्हा समोर आली आहे. (First he got drunk, then he got beaten up! Radha in Shiv Sena in the city)

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही मागील वेळी त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. त्या वेळी राज्यात राजकीय परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा महापौर झाला होता. या वेळी मात्र राजकीय परिस्थिती बदलली. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादी मित्रपक्ष आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादी काॅंग्रेसने शिवसेनेला साथ देत शिवसेनेला सत्ता दिली. राष्ट्रवादीलाही उपमहापौरपद मिळाले.

शिवसेनेला महापौरपद देताना या पदासाठी आरक्षणानुसार शिवसेनेकडे तीन उमेदवार होते. रोहिणी संजय शेंडगे, रिता शैलेश भाकरे व शांताबाई दामोदर शिंदे. या तीनपैकी एकाला ही संधी मिळणार होती. तथापि, रोहिणी शेंडगे यांचे नाव प्रारंभापासून या पदासाठी घेतले जात होते. अखेर शेंडगे यांनाच संधी मिळाली. इतर दोघांना मात्र पक्षादेशामुळे थांबवावे लागले. त्या बदल्यात संबंधितांना काय शब्द दिला, कोणत्या मुद्द्यावर ही तडजोड झाली, हा भाग वेगळा. दरम्यानच्या काळात शेंडगे यांचा काल उमेदवारी अर्ज भरण्यात आला. एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध महापौर झाल्या.

याच पार्श्वभूमीवर काल रात्री एका हाॅटेलवर इतर दोनपैकी एका नगरसेवकाच्या नातेवाईकाला दारु पाजून त्याला मारहाण केल्याची त्याची तक्रार आहे. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात तो म्हणतो, की मी महापौरपदाची माघार घेतली होती. मला जातीवर शिव्या देऊन मारहाण केली, असे त्याने संबंधित व्हिडिओत म्हटले आहे. 

दरम्यान, ही मारामारी कोणत्या कारणाने झाली. संबंधिताने माघार घेऊनही त्याला कोणत्या कारणाने चोपले, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. इतका मार खाऊनही त्याने पोलिसात गुन्हा का नाही नोंदविला, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

याचे पडसाद मात्र आजच्या महापौर निवडणुकीत दिसले नाहीत. सभा आॅनलाईन असल्याने महापालिकेत केवळ दोनच उमेदवार व अधिकारी उपस्थित होते. इतर सर्व नगरसेवक आॅनलाईन उपस्थित होते. प्रत्येकी एक-एक अर्ज असल्याने ही सभा बिनविरोध झाली. मात्र महापालिकेत पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com