नगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत मध्यरात्री `फ्री स्टाईल`

या पार्श्वभूमीवर रात्री शिवसेनेतील एका नगरसेवकाच्या नातेवाईकाला मारहाण करण्यात आली.सत्ता येऊनही असे प्रकार शोभत नाहीत, अशी समजूत घालून वरिष्ठ नेत्यांनी अखेर या वादावर पडदा टाकला.
 Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर : महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री 12 च्या दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. शहरातील एका हाॅटेलवर झालेल्या या घटनेचे प्रकरण कोतवाली पोलिस ठाण्यापर्यंत गेले, परंतु पक्षाच्या वरिष्ठांच्या मध्यस्तीने मिटविण्यात आले. (Shiv Sena workers in the city at midnight `Freestyle)

महापौर निवडीसाठी आज (ता. 30) सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महापौरपदासाठी शिवसेनेच्या एक उमेदवाराने अर्ज भरला. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या एकाने अर्ज भरला. त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. आज मतदानाची केवळ औपचारीकता बाकी आहे.

या पार्श्वभूमीवर रात्री शिवसेनेतील एका नगरसेवकाच्या नातेवाईकाला मारहाण करण्यात आली. सत्ता येऊनही असे प्रकार शोभत नाहीत, अशी समजूत घालून वरिष्ठ नेत्यांनी अखेर या वादावर पडदा टाकला. 

या प्रकाराबाबत मात्र शिवसेनेचे कोणतेही नेते काहीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. आज सकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

दरम्यान, महापालिकेत आता शिवसेनेची सत्ता येत आहे. गेले अडीच वर्षे शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली होती. त्या वेळी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर झाला होता. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी हे मित्र पक्ष असल्याने राष्ट्रवादीच्याच मदतीने शिवसेनेला महापौरपद मिळत आहे. या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्यात आले आहे.

महापौर निवडीच्या आधीच झालेल्या या मारामारीच्या प्रकारामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा..

विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराचा भुर्दंड ग्राहकांना

संगमनेर : कोणत्याही शासकीय यंत्रणेत सामान्य ग्राहक भरडला जातो. विद्यूत मंडळासंबधी अनेक अडचणी अन्याय सहन करून वीज वापरीत असताना विद्युत मंडळाचे अधिकारी, कर्मचारी साहेबी थाटात ग्राहकांना छळत असतात.

ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, सहकार्य करणे या ऐवजी ग्राहकांची अडवणूक करून भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती बळावल्याने नियमानूसार व ग्राहकाभिमूख अधिकारी-कर्मचार्‍यांची कोंडी होते. तसेच ग्राहकांच्या पैशांचे, वेळेचे नुकसान होऊन मनस्ताप सहन करावा लागतो. किंवा भ्रष्टाचारास बळी पडावे लागते. सामान्य ग्राहकांवरील अन्यायनिर्मूलनासाठी संघर्ष सामाजिक संघटना, विद्युत ग्राहकांच्या तक्रारींची माहिती मागवीत आहे.

विद्युत ग्राहकांनी त्यांची माहिती, संघर्ष सामाजिक संघटना. जोंधळे हॉस्पिटलचे वर, घासबाजार,संगमनेर, येथे सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत जमा करावी.
आलेल्या तक्रारींची योग्य चौकशी करून तक्रारनिवारणासाठी संस्थेकडून सहकार्य केले जाईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com