विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर, डाॅ. रमेश धोंगडे यांना `जीवनगौरव`

ज्येष्ठ साहित्यिक व समिक्षक डॉ. रमेश धोंगडे यांना “पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.
Dr. ramesh dhongade 1.jpg
Dr. ramesh dhongade 1.jpg

शिर्डी : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या २०१९ च्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली असून, ज्येष्ठ साहित्यिक व समिक्षक डॉ. रमेश धोंगडे यांना “पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. (Vikhe Patil Sahitya Puraskar announced, Dr. Lifetime Achievement to Ramesh Dhongade)

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मकरंद साठे (पुणे) याच्या गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी या कादंबरीस, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार नितीन भारत वाघ (नाशिक) यांच्या प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत या समीक्षा ग्रंथास दिला जाणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.

नगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (नेवासा) यांच्या अधांतरीचे प्रश्न या कवितासंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (नगर) यांच्या साहित्य संशोधन वाटा आणि वळणे या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार असून, यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार यांना, आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप यांना देण्यात येणार असल्याचेही पुरस्कार निवड समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

कोविड संकटामुळे २०१९ च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची ही ३० वर्षांची परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे.

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 22) प्रवरानगर येथे कोविड-१९ च्या नियमावलींचे पालन करून छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा..

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसह राज्यातील इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरु असल्याचे निवड समितीचे सदस्य-निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com