नगरचा कोरोना वाढता वाढे ! दिवसभरात घेतले सात बळी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १५०, खासगी प्रयोगशाळेत २२५, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत २६३ रुग्ण आढळून आले.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

नगर : जिल्ह्यात दिवसभरात नवे ६३८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या यामुळे तीन लाख सहा हजार ४७२ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सहा हजार ३०९ झाली आहे. (The city's corona is growing! Seven victims taken during the day)

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १५०, खासगी प्रयोगशाळेत २२५, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत २६३ रुग्ण आढळून आले.

दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ७९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ९४ हजार ६४४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. सध्या पाच हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नगर तालुक्‍यात रुग्णसंख्या वाढत आहे. श्रीगोंद्यातील रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागली आहे. जामखेड व कर्जत तालुक्‍यांतील रुग्णसंख्येत मात्र अल्पशी घट झाली आहे.

तालुकानिहाय रुग्ण

संगमनेर ७७, पारनेर ९७, शेवगाव ४०, नगर तालुका ५५, श्रीगोंदे ७३, पाथर्डी ३६, नेवासे ४४, अकोले ३८, कर्जत ४१, राहाता १२, नगर शहर २७, कोपरगाव नऊ, श्रीरामपूर ३३, जामखेड १९, राहुरी २२. परजिल्ह्यांतील १५ रुग्णांचा एकूण रुग्णसंख्येमध्ये समावेश आहे.
 

हेही वाचा..

रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत बोराटे यांचे असेही प्रयत्न

नगर : जुनी महानगरपालिका आशा टॉकीज चोक ते विशाल गणेश मंदिर ते पंचपीर चावडी ते वाडिया पार्क ते जुनी महानगरपालीका ते दो बोटी चिरा ते महानगरपालिका गँरेज ते शिवम टॉकीज ते गणेश मंदिर ते भोपळे गल्ली रस्त्याचे  डांबरीकरण व काँक्रीटिकरणरक्कम ७० लाखाचे काम मंजूर झालेले आहे. या कामाची वर्कऑर्डरही ठेकेदारास देऊन ३ ते ४ वर्ष झालेले असून, हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा आहे.

वरील सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून, नागरिकांना व वयोवृद्ध लोकांना रहदारीस त्रास होत असून, सदरील खड्यामुळे टू व्हीलरच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा..

ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. तथापि हे काम अद्यापपर्यंत  सुरु करण्यात आलेले नसून या भागातील फेज २ च्या योजनेचे कामही अर्धवट ठेवलेले आहे. ते फक्त १ ते २ दिवसाचे काम बाकी आहे. तरी ते काम पूर्ण करून वरील डांबरीकरनाचे  व काँक्रीटिकरनाचे काम ताबडतोब सुरु करण्यात यावे, अन्यथा सदरील काम रद्द करून नव्याने फेर निविदा काढण्यात याव्यात.

आमच्या निवेदनाचा विचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा  नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगल लोखंडे, परेश लोखंडे यांनी दिला आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com