विरोधकांच्या काड्या-खोड्या विकासाला बाधक ! स्नेहलता कोल्हे यांची आमदार काळेंवर टीका

पोष्टमन महणून मंत्रालयातील विकास निधी थेट गांवपातळीवर आणण्यांसाठी सतत संघर्श केला.,पण विकासाचा श्रेयवाद लाटुन चाक फिरवायला आणि नारळ फोडायला भलतेच प्रतिनिधी आले, त्याचे दुःख वाटते.
Ashutosh kalen and snehalata kolhe.jpg
Ashutosh kalen and snehalata kolhe.jpg

कोपरगाव : विरोधकांच्या काडया आणि खोडया विकासाला सतत बाधा ठरतात, सत्ता असो अगर नसो पण जीवाभावाच्या माणसांसाठी आपल्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत काम करून त्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दाखल केलेले सर्वच प्रस्ताव मार्गी लावून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा नांवलौकीक राज्यात वाढविण्यांसाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. (Opposition sticks to development! Snehalta Kolhe criticizes MLA Kale)

कोपरगाव मतदार संघातील जळगाव ते चितळी या दर्जोन्नती डांबरीकरण मजबुतीकरण रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 1 कोटी 60 लाख 51 हजार रूपये खर्चाचे लोकार्पण, भाजपा बुथ संपर्क अभियान, महिला सक्षमीकरण बुधवारी करण्यांत आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्या बेबीताई निर्मळ होत्या.

हेही वाचा..

प्रारंभी गंगाधर चौधरी, भाउसाहेब चौधरी यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी कोरोना योध्देचा सत्कार करण्यात आला. कोल्हे म्हणांल्या की, गावगाडा चालविताना प्रत्येकाला कसरत करावी लागते, गेल्या पाच वर्शाच्या कार्यकाळात आपण प्रामाणिक राहुन जनतेच्या विकासाचे अनेक छोटे मोठे प्रश्न सोडविले, उर्वरित कामांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल केले. पोष्टमन महणून मंत्रालयातील विकास निधी थेट गांवपातळीवर आणण्यांसाठी सतत संघर्श केला.,पण विकासाचा श्रेयवाद लाटुन चाक फिरवायला आणि नारळ फोडायला भलतेच प्रतिनिधी आले, त्याचे दुःख वाटते. आपल्यात काहीतरी विकासशक्ती असल्यांनेच एका महिलेसाठी सारे विरोध एकवटुन लढले पण हे करत असताना अनेकांचेच त्यात नुकसान झाले.

हेही वाचा..

हेही वाचा..

प्रशांत हासे यांना विभागीय आदर्श तलाठी पुरस्कार

संगमनेर : महसूल दिनानिमित्त नाशिक विभागीय स्तरावरील आदर्श तलाठी पुरस्कार, तालुक्यातील पिंपरणे येथे कार्यरत असलेले तलाठी प्रशांत हासे यांना नुकताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

2020 - 2021 या महसूल वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामासाठी मिळालेल्या पुरस्कारात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम कोकणच्या पूरग्रस्तनिधीसाठी देणार असल्याचे हासे यांनी जाहीर केले आहे.

कोरोना काळात गावातील दक्षता समितीच्या सहाय्याने विविध उपाययोजना राबवून, कोवीड प्रादुर्भावापासून ग्रामस्थांना दूर ठेवण्यासाठी तसेच कोवीडची साखळी तोडण्यासाठी हासे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे, पिंपरणे गावात कोवीडच्या रुग्णांची संख्या वाढली नाही. महसूली कामकाजातील त्यांचे कौशल्य व कर्तव्य परायणता याची दखल घेत प्रशासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

या पुरस्काराबद्दल पिंपरणे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी उपसरपंच अजित देशमुख, सदस्य संजय बागुल, मंजाबापू साळवे, उत्तम राहिंज, मुरलीधर बागुल, गंगाराम वाकचौरे, सुरेश कर्पे, राहुल निकम, भिमा राहिंज, श्रीकांत बागुल, सुनिल देशमुख आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com