भगवानगड पाणीयोजनेचे त्रांगडे ! राजळे - तनपुरे यांच्यात एकवाक्यता होईना

येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी २०१४ साली खरवंडीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जायकवाडीचे पाणी पाईलाईनने भगवानगडावर आणण्याचा व तेथून परिसरातील ३५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा ठराव केला.
Rajale and tanpure.jpg
Rajale and tanpure.jpg

पाथर्डी : भगवानगड (Bhagwangad) व पस्तीस गावांना जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या योजनेवरुन तालुक्यातील चांगलेच राजकारण तापले आहे. पाणी योजनेचे संकल्पक संजय बडे यांनी युती सरकारने फसवी घोषणा केल्याचे सांगितले. आमदार मोनिका राजळे यांनी योजनेचा जलजिवन मिशनमधे समावेश करुन काम सुरू केल्याचे सांगितले, तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी योजना मंजूर नाही. मात्र प्राथमिक सर्वेक्षण सुरू करू असे सांगितल्याने गोंधळात भर पडली आहे. (Trangade of Bhagwangad water project! There was no unanimity between Rajale and Tanpure)

येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी २०१४ साली खरवंडीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जायकवाडीचे पाणी पाईलाईनने भगवानगडावर आणण्याचा व तेथून परिसरातील ३५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा ठराव केला. तसेच माजी आमदार स्व. राजीव राजळे व आमदार मोनिका राजळे यांच्या मार्फत व तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांच्यासमोर योजनेचा आराखडा मांडला. सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार झाले. ९२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले.

पुढे सरकार बदलले. चौकशी केली असता योजना मंजूर नसल्याचे समजले. आमदार मोनिका राजळे यांनी योजनेचा जलजीवन मिशनमधे समावेश करुन काम सुरू केल्याचे सांगितले, तर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी योजना मंजूर नाही. मात्र प्राथमिक सर्वेक्षण सुरू करू असे सांगितल्याने गोंधळात भर पडली आहे. त्यामुळे बडे यांनी राजकारण विरहीत संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला.

हेही वाचा..

युती शासनाच्या काळात भगवानगड व पस्तीस गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली होती. आम्ही तत्कालीन मंत्री बबन लोणीकर यांना पेढे भरवून आलो. आता ती केवळ पोकळ घोषणा असल्याचे समजले. पाणी योजनेसाठी संघर्ष सुरूच ढेवू.
- संजय बडे, संकल्पक, भगवानगड पाणी योजना

या योजनेबाबत माहिती घेतली असता, ती मंजूर नसल्याचे समजले. सर्वेक्षण व आराखडा तयार करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
- प्राजक्त तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री

भगवानगड पाणी योजनेचे जलजीवन मिशनमधून सर्वेक्षण करुन आराखडा तयार करण्यासाठी नगरला जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरूच आहे.
- मोनिका राजळे, आमदार, पाथर्डी-शेवगाव मतदार संघ.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com