हे नेते अजूनही तरुण ! मुरकुटे- कर्डिले यांची रस्त्यातच कुस्ती

कोण तरूण ते पाहू,`असे म्हणत ते नेते रस्त्यात थांबले. दोघांनीही चांगली ताकद लावली. अखेर बरोबरीत सुटली.
हे नेते अजूनही तरुण ! मुरकुटे- कर्डिले यांची रस्त्यातच कुस्ती
Kardile - murkute.jpg

नगर : `कोण तरूण ते पाहू,` असे म्हणत ते नेते रस्त्यात थांबले. दोघांनीही चांगली ताकद लावली. अखेर बरोबरीत सुटली. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक होते.

भंडारदरा येथील मिटिंगच्या दरम्यान शेंडी येथे असताना रस्त्यात ही कुस्ती झाली. ज्येष्ठ संचालक व माजी आमदार शिवाजी कर्डिले व ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्यातील या कुस्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. सोबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके होते.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची मिटिंग भंडारदरा येथे झाली. संचालक अमित भांगरे यांनी याबाबत चोख नियोजन केले. मिटिंगच्या दरम्यान शेंडी येथे रस्त्यात हे संचालक थांबले. सध्या अकोले तालुक्यात पाऊस, उन-सावल्याचा खेळ सुरू आहे. निसर्ग भरभरून फुलला आहे. अशा निसर्गरम्य वातावरणाचा संचालक मंडळ आनंद घेत असतानाच कर्डिले व मुरकुटे यांच्यात कोण तरूण अशी शाब्दिक चर्चा सुरू झाली. आरोग्याला कायम महत्त्व देणारे मुरकुटे यांचा अद्यापही पुरेसा व्यायाम सुरू असतो. चला कुस्तीच लावू, असे म्हणत दोघे भिडले. सोबत शेळके हे उत्साहाने पाहत होते.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्डिले यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी पुढाकार घेतला होता. बिनविरोध निवड होण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. निवडणुकीची कुस्तीही ते लिलया जिंकले. या पार्श्वभूमीवर या कुस्तीची चर्चा आज जिल्हाभर झाली.

जिल्हा बॅंकेची निवडणूक नुकतीच झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी राज्यपातळीवरून जोरदार प्रयत्न झाले. काही संचालक बिनविरोध झाले, तथापि थोड्याच संचालकांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकीची सुत्रे हालवित अनेक जागा बिनविरोध आणण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीचे उदय शेळके यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. भाजपचे शिवाजी कर्डिले यांनीही विजय मिळवित जिल्हा बॅंकेत पुन्हा स्थान निर्माण केले. 

राजकीय हेवेदावे विसरून या संचालक मंडळाने बॅंकेचे कामकाज जोमाने सुरू केले आहे. भंडारदरा येथे मिटिंग होऊन सर्व संचालकांनी निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in