एका चेकवर लस खरेदीचे काय झाले? विखे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत विविध सरकारी योजनांचा लाभ पोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारने १४ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करून खतांचे भाव स्थिर ठेवले.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

राहाता : ‘‘कोविड प्रकोपाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील ८१ कोटी लोकांना धान्य मोफत वितरित केले. ४५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीने निराशा केली. मुख्यमंत्री एका चेकवर कोविड लस खरेदी करणार होते त्याचे काय झाले,’’ असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. (What happened to the purchase of las on a check? MLA Vikhe Patil's question to the Chief Minister)

तालुक्यातील आदिवासी बांधवांना खावटी कर्जयोजनेतून मंजूर झालेल्या किराणा किटचे वितरण करताना ते बोलत होते. आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सुकदेव गायकवाड, ‘गणेश’चे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, डॉ. राजेंद्र पिपाडा, ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, बाळासाहेब जपे, ओमेश जपे, प्रकाश चित्ते, डॉ. धनंजय धनवटे, दिनेश बर्डे, वाल्मीक गोर्डे, राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

ते म्हणाले, ‘‘शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत विविध सरकारी योजनांचा लाभ पोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारने १४ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करून खतांचे भाव स्थिर ठेवले. आदिवासी कुटुंबांना शासकीय कागदपत्रे घरपोच देण्याची व्यवस्था आपण करू.’’ ठुबे यांचेही यावेळी भाषण झाले.

मोदी सरकारचे निर्णय पोहचवावेत

वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसींकरिता २७ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या क्रांतिकारी निर्णयामुळे सामान्य विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. देशभरात या निर्णयाचे स्वागत होत आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारचे असे क्रांतिकारी निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोचवावेत.
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com