भाजपाने बाजी मारली ! या निवडणुकीच्या निमित्ताने साजन पाचपुते यांची राजकारणात एन्ट्री

भाजपाचे फुटलेले दोघे सदस्य परत मिळवित आघाडीचे दोन सदस्य फोडल्याने भाजपाच्या मनिषा कोठारे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
Sajan pachpute.jpg
Sajan pachpute.jpg

श्रीगोंदे : पंचायत समिती उपसभापती निवडीत आज नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हाती सत्तेची चावी असतानाही ऐनवेळी सुत्रे हाती घेणाऱ्या साजन पाचपुते यांनी बाजी पलटवली. (BJP won! Sajan Satpute's entry into politics on the occasion of this election)

भाजपाचे फुटलेले दोघे सदस्य परत मिळवित आघाडीचे दोन सदस्य फोडल्याने भाजपाच्या मनिषा कोठारे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या खेळीत साजन पाचपुते किंगमेकर ठरले. त्यांची ही राजकारणातील एन्ट्री मानली  जाते.

राष्ट्रवादीच्या रजनी देशमुख यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने आज निवडीची सभा बोलाविण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या ताब्यात पंचायत समिती सत्ता होती. गेल्या निवडीत भाजपाचा एक सदस्य फुटल्याने याहीवेळी आघाडीकडेच उपसभापतीपद जाईल असे जाणकार सांगत होते. त्यातच भाजपाचा अजून एक सदस्य राष्ट्रवादीने फोडल्याने सगळीच गणिते एकतर्फी झाली होती.

हेही वाचा..

भाजपाला दिवगंत नेते सदाशिव पाचपुते यांच्या राजकीय खेळीची उणिव भासत असतानाच त्यांचे पुत्र, साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी या निवडीत एन्ट्री केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या रजनी देशमुख व काँग्रेसचे जिजाबापु शिंदे यांना फोडले. या घडामोडी विळद घाटातून विखेपाटील तसेच आमदार बबनराव पाचपुते यांच्या सूचनेवरुन सुरु होत्या, मात्र तीत साजनची भुमिका निर्णायक ठरत होती.

आज सकाळी भाजपाचे यापुर्वी फुटलेले दोन सदस्यांनाही सोबत घेत पाचपुते यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री केली. बहुमत होत असल्याचे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार कल्याणी लोखंडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. आघाडीकडे लोखंडे यांच्यासह अण्णासाहेब शेलार व सभापती गितांजली पाडळे हे तीनच सदस्य राहिले. आमदार पाचपुते यांच्या उपस्थितीत सदस्यांच्या झालेल्या बैठकीत कोठारे यांना उपसभापतीपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

बाळासाहेब नाहाटा ठरले पुन्हा एकदा हिरो

तोडाफोडीच्या राजकारणात तरबेज असणाऱ्या बाळासाहेब नाहाटा यांनी  आज  हारलेली बाजी जिंकण्यासाठी पाचपुते गटाला मदत केली. साजन पाचपुते यांच्या सोबत नाहाटा असल्याने ही लढाई काँग्रेस आघाडी हरल्याची चर्चा आहे.  नाहाटांची सोबत आणि विखेपाटील कुटूंबासोबत आमदार पाचपुते यांचा अनुभव भाजपाच्या आजच्या विजयात उपयोगी ठरल्याचे बोलले जाते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com