विखे कुटुंबिय पंतप्रधान मोदी यांना भेटले ! दिली ही आगळी-वेगळी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सहकारमंत्रालय स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला. आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या या भेटीत आपण त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
 Vikhe 2.jpg
Vikhe 2.jpg

शिर्डी ः सहकारक्षेत्रातून भाजपात आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा मिनीटांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव खासदार डाॅ. सुजय, स्नुषा धनश्री व सात वर्षांची चिमुरडी नात अनिषा होती. याभेटीत विखे पाटील यांनी सहकारक्षेत्रातील सुधारणांबाबत निवेदन देत आणि साईसमाधिवरील फुलांपासून महिला बचत गटांनी तयार केलेला धुप आणि अगरबत्तीची भेट त्यांना दिली. (Vikhe family meets PM Modi! This is a very special gift)

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सहकारमंत्रालय स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला. आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या या भेटीत आपण त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

हेही वाचा..

सहकार क्षेत्रातील अपेक्षीत सुधारणांबाबत त्यांना निवेदनही दिले. आपल्या कुटूंबातील सदस्या सोबतची ही सदिच्छा भेट अत्यंत प्रसन्न वातावरणात पार पडली. मोदी यांनी आपली चिरमुडी नात अनिषा सोबत गप्पा मारल्या आणि कॅडबरी भेट देत तिचे तोंड गोड केले.

मोदी यांनी देशातील प्रत्येक गोरगरीब समाजघटकांसाठी व्यक्तीगत लाभाच्या योजना राबविल्या. घरकुल, उज्वला गॅस, स्वच्छतागृहे अशा अनेक योजना आहेत. त्या थेट लाभार्थ्यां पर्यत पोहोच होतात. त्यामुळे गोरगरीब जनता कमालीची समाधानी आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले.

हेही वाचा..

हेही वाचा..


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com