अधिकाऱ्यांची ही तुघलकी कारवाई ! विखे पाटील यांचा आरोप

शहरातील सर्वसामान्य सुमारे सातशे ग्राहकांचे वीजजोड तोडण्यात आले. साईमंदिर बंद आहे. उत्पन्न बंद असताना ही कारवाई करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
अधिकाऱ्यांची ही तुघलकी कारवाई ! विखे पाटील यांचा आरोप
radhakrushna vradhakrushna vikhe 1.jpgikhe 1.jpg

शिर्डी : साईमंदिर दर्शनासाठी खुले होत नाही, तोपर्यंत वीजबिल भरण्याची सक्ती करू नये व वीजजोड तोडू नयेत, या मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेविका छाया शिंदे, अंजली गोंदकर व रवींद्र कोते यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर काही वेळ उपोषण केले.

या वेळी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. ६) वेळ मागितला. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. आज सकाळी अकराच्या सुमारास सुरू झालेल्या उपोषणास पाठिंबा देत भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते, ग्राहकांनी उपोषणात सहभाग घेतला.

हेही वाचा..

माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर म्हणाले, की शहरातील सर्वसामान्य सुमारे सातशे ग्राहकांचे वीजजोड तोडण्यात आले. साईमंदिर बंद आहे. उत्पन्न बंद असताना ही कारवाई करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. ही कारवाई मागे घेतली नाही, तर शुक्रवारपासून (ता. ६) आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू. यावेळी नितीन कोते, किरण बोऱ्हाडे, मंगेश त्रिभुवन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आर्थिक संकटात वीजजोड तोडणे हा तुघलकी निर्णय आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंघल यांना पाठविलेल्या पत्रात केली असून, ही कारवाई त्वरित थांबविण्याची मागणीही त्यांनी केली.

वीजजोड तोडण्याच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. ही कारवाई मागे घेतली नाही, तर भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.
- राजेंद्र गोंदकर, जिल्हाध्यक्ष, उत्तर नगर

साईमंदिर सुरू होईपर्यंत ही सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी. साईबाबांच्या शिर्डीतून आजवर महावितरण कंपनीला जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल प्राप्त होतो,
हे लक्षात घ्यावे.
- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

वीस किलोवॉटपेक्षा अधिक वीजवापर असलेल्या व्यावसायिकांचा अधिभार साईमंदिर दर्शनासाठी खुले होईपर्यंत आकारू नये. तसेच, सक्तीची वसुली थांबवून, वीजजोडणी पुन्हा करताना शुल्क आकारू नये.
- शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष, शिर्डी

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in