मंदिरे बंद झाल्याने शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडली, भाजयुमो आंदोलन करणार

पहिल्या लाटे नंतर मंदिर उघडा यासाठी भाजपाने आंदोलन छेडले, तरी देखील या सरकारने जनतेला वेठीस धरत उशिरा मंदिरे उघडलीगेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याकारणाने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण पुर्णतः ठप्प झालेले आहे.
saibaba.jpg
saibaba.jpg

शिर्डी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले असून, सर्व राज्यातील मंदिरे खुली झालेली असतांना महाराष्ट्र शासन मात्र जाणीवपूर्वक मंदिरे खुली करण्यास परवानगी देत नाही. नियम-अटी सह साई मंदिर उघडा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे माजी विश्‍वस्त सचिन तांबे यांनी सरकारला दिला आहे. (Shirdi's economy collapses as temples close, BJP protests)

पत्रकात तांबे यांनी म्हटले, की पहिल्या लाटे नंतर मंदिर उघडा यासाठी भाजपाने आंदोलन छेडले, तरी देखील या सरकारने जनतेला वेठीस धरत उशिरा मंदिरे उघडली
गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याकारणाने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण पुर्णतः ठप्प झालेले आहे. त्यामुळे शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार प्रसाद, विक्रेते, ट्रॅव्हल्सवाले, फुलाचे शेतकरी, चहा नाष्टा विक्रेते व इतर हातावर उपजिविका असणार्‍या प्रत्येकाला गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे.

कर्जाची हप्ते थकल्याने अनेक हॉटेल, घर, दुकाने सील केली जात आहेत.महावितरण तुघलकी वसुली करत आहेत त्यांची टार्गेटपुर्तीसाठी दमदाटी, अरेरावी, नागरीकांना सहन करावी लागत आहे. त्यावर सरकारचा अंकूश राहिलेला नाही. घरपट्टी, पाणीपट्टी वेगवेगळे कर कमी करण्यासाठी प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली परंतु कुठलाही निर्णय या सरकारने दिलेला नाही. खासगी शैक्षणिक संस्थांनी देखील फी साठी तगादा लावल्याने अनेक पालकांनी मुलांचे शिक्षण थांबविले आहे. अशा अनेक गंभीर संकटांमुळे अनेकांनी आपले जीवन संपविले.

हेही वाचा..

मंदिर खुले असतांना एकही भक्ताला व कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाला नाही महाविकास आघाडी सरकारचे वसुलीकडे लक्ष आहे. बार दारु दुकाने सुरु आहेत, राजकीय कार्यक्रम सुरु आहेत, सर्व काही सुरळीत आहे. साई मंदिर पुर्णपणे सुरक्षित असतांना ऑनलाईन बुकिंगद्वारे व ज्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहेत या नियम अटीसह का उघडत नाही 0 असा सवाल उपस्थित केला आहे. समन्वय नसलेले आघाडी सरकार आणखी किती दिवस लोकांच्या आस्थेचा व भावनेचा उद्रेक वाढू देणार त्यामुळे या नियम-अटी सह साई मंदिर उघडा अन्यथा होणार्‍या परिणामांना सरकार म्हणुन तुम्हीच जबाबदार असाल असेही पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com