आमदार सुधीर तांबे यांचा घरचा आहेर ! म्हणाले सरकारचे शिक्षणाकडे दुर्लक्ष

आज शिक्षण क्षेत्रात अनेक जागा रिक्त आहेत. त्याचा शिक्षणावर मोठा दुष्परिणाम परिणाम होत आहे. मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे.
आमदार सुधीर तांबे यांचा घरचा आहेर ! म्हणाले सरकारचे शिक्षणाकडे दुर्लक्ष
Dr. sudhir tambe.jpg

पारनेर : प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. उद्योग व्यावसाय असो की दैनंदिन जगणे असो, जीवनात सर्वच क्षेत्रात शिक्षणाला अनन्यसाधरण महत्व आहे. शिक्षणाशिवाय विकासाला गती मिळणार नाही, असे असूनही शिक्षणा़कडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी व्यक्त करून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. (MLA Sudhir Tambe's home! Said the government neglects education)

प्रत्येक क्षेत्रासाठी कुशल कामगार निर्माण देण्याची क्षमता फक्त शिक्षणात आहे. मात्र कुशल कामगार तयार करण्याचे काम ज्या शिक्षणातून होत असते, त्या शिक्षण क्षेत्राकडे मात्र राजकर्त्यांचे दुर्लक्षित झाले आहे. शिक्षणाकडे पहाण्याचा द्रुष्टीकोण बदलत चालला आहे, ही बाब योग्य नाही. राज्याचा वेगाने विकास साधावयाचा असेल तर शिक्षण हेच मुक्य साधन आहे. विविध क्षेत्रातील कुशल तंत्रज्ञान अवगत असलेली माणसे तयार कराण्याचा कारखाणा म्हणजे शिक्षण होत. मात्र त्या शिक्षणाकडेच सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

आज शिक्षण क्षेत्रात अनेक जागा रिक्त आहेत. त्याचा शिक्षणावर मोठा दुष्परिणाम परिणाम होत आहे. मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. आजचे विद्यार्थी हेच देशाचे उद्याचे अधारस्तंभ आहेत. आज असणारे विद्यार्थी शिक्षणातून व्यवस्थीत घडले गेली नाही तर भविष्यात राज्याला देशाला लगणारे शिक्षक, तंत्रज्ञ, डॉक्टर , संशोधक कसे तयार होणार हा विचार होणे गरजेचे आहे. राज्य़ाला तसेच देशाला प्रतेक क्षेत्रात वेगाने प्रगती करावयाची असेल तर त्या साठी शिक्षणात प्रगती झाली पाहिजे. नवनविन पद्धीचे अधुनिक शिक्षण मुलांना मिळणे गरजेचे आहे. नविन व अधुनिक पद्धीच्या शिक्षणाची कास धऱणे गरजेचे आहे.

हेही वाचा..

देशाच्या व राज्याच्या प्रगतीसाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करूण चालणार नाही. शिक्षमाकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा विकासावर मोठा परिणाम झाल्या शिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले. दरम्यान, याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.