अकोल्याला प्रस्तावित केलेला लोहमार्ग संगमनेरला गेलाच कसा

नाशिक-पुणे लोहमार्ग तालुक्यातून जाणार होता व देवठाण येथे थांबा ठेवण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील जनतेची सोय झाली असती. शेतकरी, व्यावसायिक, नोकरदारांना हा सोयीस्कर प्रवास होता.
Madhukar pichad.jpg
Madhukar pichad.jpg

अकोले : पुणे-नाशिक लोहमार्ग अकोले तालुक्यातून जाण्यासाठी आपण दहा वर्षांपूर्वीच प्रयत्न केले होते. तो नकाशा देखील अपणाकडे उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग बदलून संगमनेरमार्गे का गेला, हे समजत नाही. याबाबत लवकरच केंद्रीय नेतृत्वाशी बोलू, असे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तालुक्यातील एका शिष्ट मंडळाशी बोलताना सांगितले. (How the railway line proposed to Akola went to Sangamner)

नाशिक-पुणे लोहमार्ग तालुक्यातून जाणार होता व देवठाण येथे थांबा ठेवण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील जनतेची सोय झाली असती. शेतकरी, व्यावसायिक, नोकरदारांना हा सोयीस्कर प्रवास होता. या मार्गाचे सर्वेक्षण होताना आपण हा लोहमार्ग तालुक्यातून गेल्यास त्याचा निश्चित फायदा होईल, याबाबत संबंधितांना सूचनाही केल्या होत्या. त्याप्रमाणे नकाशात दर्शविण्यात आले. मात्र अलीकडे हा मार्ग बदलला असून, याबाबत केंद्रीय नेतृत्वाशी, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलून हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करू. संगमनेर तालुक्यात चारपदरी रस्ता आहेच. मात्र अकोले तालुक्याला पुणे-नाशिकला संपर्क करण्यासाठी हा लोहमार्ग महत्त्वाचा असून, राजकीय इछाशक्ती असावी लागते. लवकरच याबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लाऊ, असे पिचड म्हणले. 

हेही वाचा..

हेही वाचा..

नगराध्यक्षांचा व्यापाऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न
 

श्रीरामपूर : नियमाचे उल्लंघन झाले. म्हणून एकीकडे नगरपालिका व्यापाऱ्यांवर कारवाई करते. याबाबतचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहे. सध्या सत्ताधारी लोक एकीकडे अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडते. तर दुसरीकडे नगराध्यक्षा स्वतः व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी उपोषण करतात. आता याला नेमके काय म्हणावे. व्यापारी व नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न नगराध्यक्षा करीत आहेत, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी उपस्थित केला आहे.

बिहाणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील दुकाने वेळेच्या आत बंद न केल्यामुळे पोलिसांनी कारवाई करु शहरातील काही दुकाने सील केली होती. व्यापाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घेऊन सील केलेली दुकाने तातडीने खुली करण्याच्या मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटी व मर्चंट असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली होती.

शहरातील व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात सोमवारी (ता. नऊ)ला जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांची भेट घेतली. या संदर्भात संध्याकाळी बैठक घेऊन या दुकानांवरील कारवाई मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले होते, असे उपनराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com