नेवाश्यात वाळुतस्करांची मुजोरी ! टार्गेट तलाठी अन कोतवाल

वाळू परवाना बाबत विचारले असता चालकाने भ्रमणध्वनी वरून आपल्या साथीदारांना वाहन पकडल्याची माहिती देत वाहन सोडून पळून गेला.
VAlu taskari.jpg
VAlu taskari.jpg

नेवासे : अवैध वाळू वाहातुक करणारे वाहन अडवले म्हणून कामगार तलाठी व कोतवाल यांना वाळूतस्करांनी मारहाण करून टेम्पो वाळूसह पळून नेल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. १०) रोजी नेवासे येथे चिंचबन रोडला घडला. यामुळे गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या नेवाशात पुन्हा वाळूतस्करितून गुन्हेगारी फोफावते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Sandbags in Newash! Target Talathi Un Kotwal)

छुप्यापद्धतीने होत असलेली अवैध गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार रुपेशककुमार सुराणा यांच्या आदेशावरून खुपटी (ता. नेवासे) सजाचे कामगार तलाठी गणेश आप्पासाहेब घुमरे व खुपटी गावचे कोतवाल बाळासाहेब चौधरी हे दोघे दुचाकीवरून गस्त घालत असतांना त्यांना पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेवासे शहरालगत असलेल्या चिंचबन रस्त्यावरून एक विनानंबर आयशर टेम्पो हे वाहन जात असताना दिसला तलाठी घुमरे व कोतवाल चौधरी यांनी टेम्पो अडवून तपासणी केली असतात त्यात दोन ब्रास वाळू आढळून आली. वाळू परवाना बाबत विचारले असता चालकाने भ्रमणध्वनी वरून आपल्या साथीदारांना वाहन पकडल्याची माहिती देत वाहन सोडून पळून गेला.

दरम्यान, काही वेळातच टेम्पोचे पाठीमागे एक पांढरे रंगाची स्वीप्ट कार आली व तिचे मधुन दत्तात्रय आसाराम हिवरे (रा.नेवासे खुर्द) व त्याचे सोबत दोन अनोळखी जोडीदार उतरले व त्यांनी घुमरे व चौधरी यांना तुम्ही आमचा टेम्पो कसाकाय पकडला असे म्हणुन दोघांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करित तुमचे आम्ही आता हातपाय मोडुन टाकु अशी धमकी दिली. याचवेळी पळुन गेलेला टेम्पो चालक आला व त्याने टेम्पो दोन बाँस वाळुसह पळून घेऊन गेला.
याप्रकरणी नेवासे पोलिसांत आरोपी दत्तात्रेय हिवरे सह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..

प्रशासन करते काय

गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी नेवासे शहरासह तालुका वाळूतस्करांच्या हौदोसणे बदनाम झाला होता. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत वाळू टास्करांची हा उपद्रव नव्हता मात्र आज झालेल्या प्रकारामुळे पुन्हा महसूल व पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्यात सापडले असून या दोन्हीही विभागाने वेळीच वाळू तस्करांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

"अवैध गौण खनिज उपाशी विरोधात आमची सातत्याने कारवाई चालू आहे. यापुढे ती आधी तीव्र करणार.
- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com