कोठेवाडीतील भयावह स्थितीवर आमदार राजळेंनी सुचविला हा उपाय

महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या कोठेवाडी येथील दरोडा व सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुरुंगातुन बाहेर आल्याने कोठेवाडी व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Monika rajale.jpg
Monika rajale.jpg

पाथर्डी : कोठेवाडी प्रकऱणातील एक आरोपी अद्यापही पोलिस यंत्रणेला सापडला नाही हे दुर्दैव आहे. त्या आरोपीकडुन ग्रामस्थआंना व महिलांना धोका पोहचु शकतो. तात्तपुरता पोलिस बंदोबस्त नको, कोठेवाडीत कायमस्वरुपी पोलिस चौकी मंजुर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन तुम्ही घाबरु नका, मी व पोलिस प्रशासन तुमच्या सोबत अहोत, अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी आज कोठेवाडीतील महिला व ग्रामस्थांना दिली. (MLA Rajale suggested this solution to the dire situation in Kothewadi)

महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या कोठेवाडी येथील दरोडा व सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुरुंगातुन बाहेर आल्याने कोठेवाडी व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी कोठेवाडी येथे ग्रामस्थांसोबत व तेथील महिलांसोबत संवाद साधण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी भेट दिली.

माणिक खेडकर, अंकुश चितळे, रावसाहेब मोरे, संजय चितळे, विष्णु कोठे, समीर पठाण, गिन्यानदेव कोठे, दत्तु कोठे, किरण कोठे, किशोर पवार, मिराबाई कोठे उपस्थित होते.

हेही वाचा..

या वेळी आमदार राजळे यांनी महिलांना धीर दिला. तुम्ही एकट्या नाहीत, मी तुमच्या सोबत आहे. सरकारने पोलिस चौकी मंजुर करावी, यासाठी मी पाठपुरावा करील. तसा प्रस्ताव पाठविलेला आहे. तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. मला हाक दिली की मी येथे य़ेईल असे राजळे म्हणाल्या. 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com