गणेशवंदन करीत महापौर रोहिणी शेंडगेंनी घेतला पदभार! केला हा संकल्प

श्री विशाल गणेशाने सर्वांच्याच मनोकामना पूर्ण केल्या आहेत. श्री गणेशाच्या कृपेने महापौरपदाची संधी आपणास मिळाली आहे.
mahapaur.jpg
mahapaur.jpg

नगर : नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीचे (Vishal Ganpati) दर्शन घेऊन आज शिवसेनेच्या महापाौर रोहिणी शेंडगे यांनी पदभार स्विकारला. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. नगरचा चेहरा बदलू, असा संकल्प त्यांनी या वेळी केला. (Mayor Rohini Shendge takes charge while paying homage to Ganesh! Kela made this resolution)

श्री विशाल गणेशाने सर्वांच्याच मनोकामना पूर्ण केल्या आहेत. श्री गणेशाच्या कृपेने महापौरपदाची संधी आपणास मिळाली आहे. तेव्हा या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न करु. सर्वांच्या सहकार्याने नगर शहराचा परिपूर्ण व नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही ग्रामदैवत श्री विशाल गणेशापासून होत असल्याने आपल्या नूतन पदाचा शुभारंभ श्री गणेशाला वंदन करून घेऊन नगर विकासाचा संकल्प आपण करत आहोत. या कार्यात सर्वांचे सहकार्य घेणार असून, प्रत्येकाचे शहराच्या विकासात योगदान असावे, यासाठी एकत्रित प्रयत्नातून आपले शहर विकसित करु, असा विश्‍वास नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला.

महापौर शेंडगे यांचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने सचिव अशोक कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पुजारी संगमनाथ महाराज, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका पुष्पा बोरुडे आदी उपस्थित होते.

कानडे म्हणाले, की महापौर हा प्रथम नागरिक असल्याने शहरातील प्रत्येकाचे पालकत्व त्याचे असते. त्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागते. रोहिणी शेंडगे या आपल्या कार्यकर्तुत्वाने महापौर पदाच्या माध्यमातून नगर शहराला वैभव प्राप्त करुन देतील. श्री विशाल गणेश त्यांच्या चांगल्या कार्यात त्यांच्या पाठिशी राहिल, असा विश्‍वास व्यक्त केला.

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com