Police.jpg
Police.jpg

रक्षकच झाला भक्षक ! गुन्ह्यातील सोने पोलिसाने ठेवले गहाण

शिंदे सध्या रजेवर असल्याने पुढील मुद्देमालाची तपासणी करता आली नाही. प्रथमदर्शनी पाच लाख ४६ हजार ६४० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर : रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार नगर तालुका पोलिस ठाण्यात घडला आहे. तेथील पोलिस नाईक गणेश नामदेव शिंदे (बक्कल क्रमांक १०१७) (Ganesh Shinde) यांच्यावर गुन्ह्यातील मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यांनी या मुद्देमालातील सोने बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. (Rakshak became a eater! The gold in the crime was mortgaged by the police)

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या फिर्यादीवरून आरोपी पोलिस नाईक गणेश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गणेश नामदेव शिंदे यांच्यावर पोलिस ठाण्यातील विविध गुन्ह्यांतील मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यांनी सात मार्च २०२० ते २९ जून २०२१ या कालावधीत त्यांच्याजवळील मुद्देमालातील सोन्याचे दागिने फायनान्स कंपनीत तारण ठेवले. त्यावर रोख पाच लाख ४६ हजार ६४० रुपये कर्ज घेतले. हे कर्ज स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

ही बाब सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र अशोक सानप यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भिंगार पोलिस ठाण्यात आरोपी शिंदे यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४०८, ४०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिंदे सध्या रजेवर असल्याने पुढील मुद्देमालाची तपासणी करता आली नाही. प्रथमदर्शनी पाच लाख ४६ हजार ६४० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख तपास करीत आहेत.

हेही वाचा..

जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोरोना रुग्णांची वाढ

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी (ता. एक) नवीन ४८७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ८० हजार ३४१ झाली आहे. बारा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या पाच हजार ९०४ झाली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २२, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २०५ तर अँटिजेन चाचणीत २६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्‍यांनी आघाडी घेतली आहे. पाथर्डी, श्रीगोंदे आणि पारनेर तालुक्‍याने रुग्ण संख्येत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. या तिन्ही तालुक्‍यांमध्ये १८३ नवीन बाधित आढळून आले आहेत.

पाथर्डीमध्ये सर्वाधिक ६५ रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी श्रीरामपूर
तालुक्‍यात अवघे तेरा रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दोन हजार १५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या ४६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ७२ हजार २८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१२ टक्के झाले आहे.

तालुकानिहाय रुग्ण संख्या याप्रमाणेः पाथर्डी ६५, श्रीगोंदे ६२, पारनेर ५६, राहाता ३७, राहुरी ३६, जामखेड ३३, नगर तालुका व संगमनेर प्रत्येकी ३०, नेवासे २८, शेवगाव २६, कोपरगाव १८, नगर शहर व कर्जत प्रत्येकी १६, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी १३, तसेच भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत तीन, लष्करी रुग्णालय दोन तर बाहेरील जिल्ह्यातील तीन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com