पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिला इशारा ! तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर

राज्यात ऑक्सिजन कमी पडू शकतो. याची दक्षता म्हणून जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
 Hasan mushrif 1.jpg
Hasan mushrif 1.jpg

जामखेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उंबरठ्यावर आहे. यावेळी रुग्णसंख्या चौपट वाढणार आहे. तसे होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. उपाययोजना केल्या नाही तर धोका जास्त आहे. नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी. या पार्श्वभूमीवर शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. (Guardian Minister Mushrif gave a warning! Danger of the third wave on the threshold)

जामखेड येथील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा व याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या पन्नास बेडच्या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सांगळे, उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, सभापती राजश्री मोरे, सूर्यकांत मोरे, मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, की राज्यात ऑक्सिजन कमी पडू शकतो. याची दक्षता म्हणून जिल्ह्यात चौदा ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
आमदार पवार म्हणाले, की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेडमध्ये सर्वांचे सहकार्य लाभले. सुरवातीला कोरोनाला प्रतिबंध करताना, बाहेरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विलीनीकरण कक्षात ठेवून तेथेच उपचार केले जात होते. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी जामखेड व कर्जत येथे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली. यासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com