आमदार लंकेंकडून मारहाण झाल्याची पोलिसांकडे तक्रार, नंतर तक्रारदारांचीच माघार

जिल्हा शल्यचिकित्सक व पारनेर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जावर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांची सही असून, तो अर्ज सोशल मीडियावरही व्हयरल झाला
आमदार लंकेंकडून मारहाण झाल्याची पोलिसांकडे तक्रार, नंतर तक्रारदारांचीच माघार
Nilesh lanke.jpg

पारनेर : आमदार नीलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राहुल पाटील यांना मारहाण केल्याची तक्रार रुग्णालयाच्या अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच पारनेर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा प्रकार घडला नसून, मला कोणतीच तक्रार करावयाची नाही व पुढे काही वाढवावयाचे नाही, असे त्यांनी सांगितले. (Complaint to the police that MLA Lankan was beaten, then the complainants withdrew)

जिल्हा शल्यचिकित्सक व पारनेर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जावर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांची सही असून, तो अर्ज सोशल मीडियावरही व्हयरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काल (ता. ४ ) रात्री साडेआठ वाजता तहसीलदार व रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ. श्रद्धा अडसूळ यांच्या आदेशानुसार कोरोना लसीचे टोकण वाटप करण्यात आले होते. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता आमदार व डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे आरोग्य कर्मचारी कनिष्ट लिपिक राहुल पाटील यांना घरून बोलावून घेतले. त्यांच्यावर टोकण विकल्याचे आरोप करूण कोणतीही शहानिशा न करता आमदार लंके यांनी मारहाण केली. तसेच त्या वेळी कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी यांनाही शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या समोरच घडल्याचेही अर्जात म्हटले आहे.

हेही वाचा..

या तक्रार अर्जाबाबत आरोग्य अधिकारी डॉ. उंद्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूणही त्यांनी फोन घेतला नाही.

आमच्या समोर मारहाण झाली नाही

आमच्या समोर मारहाण झालेली नाही. मात्र आमच्याकडे तक्रार अर्ज आला आहे. त्यानुसार मी स्वत: आरोग्याधिकारी डॉ. मनीषा उंद्रे यांच्याकडे जाऊन चौकशी केली, तर त्यांनी मला तक्रार करावयाची नाही. मी विचार करून सांगते, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल नाही. फक्त तक्रार अर्ज आलेला आहे.
- घनश्‍याम बळप, पोलिस निरीक्षक
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in