हजारे यांच्या आंदोलनांचे संग्रहालयरूपी जतन, राळेगणसिद्धीत सचित्र माहिती

देशात वेगवेगळी संग्रहालये असली, तरी जनआंदोलनाचे संग्रहालय प्रथमच साकारत आहे. लवकरच ते सर्वांसाठी खुले होत आहे.
anna hajare2.jpg
anna hajare2.jpg

पारनेर : झोळी पसरून जनतेकडून जमा झालेल्या निधीवर व केवळ जनआधारावर उभ्या राहिलेल्या, तसेच देशभरातच नव्हे, तर जगात गाजलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनांचा समग्र इतिहास सचित्र माहिती रूपात राळेगणसिद्धी येथे साकारत आहे. त्यांनी केलेल्या ३० वर्षांच्या विविध जनआंदोलनांच्या ऐतिहासिक माहितीचे संग्रहालय आकार घेत आहे. (Museum of Hazare's movement preserved, illustrated information in Ralegan Siddhi)

देशात वेगवेगळी संग्रहालये असली, तरी जनआंदोलनाचे संग्रहालय प्रथमच साकारत आहे. लवकरच ते सर्वांसाठी खुले होत आहे.

राळेगणसिद्धीला आदर्श गाव म्हणून उभे केल्यानंतर देशाला ग्रामविकासाची दिशा देण्याचे काम हजारे यांनी केले. मात्र राज्याचा व देशाचा विकास होत असताना विकासकामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती, हा विकासातील मोठा अडथळा आहे हे लक्षात आल्यानंतर हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात १९९०पासून जनआंदोलनांना राळेगणसिद्धी या छोट्या खेड्यातून सुरवात केली. जनहिताचे व भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे हाती घेऊन सलग ३० वर्षे राज्यात हजारे यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने झाली. त्यातूनच प्रथम राज्यातील व नंतर देशातील जनतेला माहितीचा अधिकार कायदा मिळाला. त्यानंतर मात्र हजारे यांची आंदोलने थेट देशपातळीवर पोचली.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर २०११मध्ये लोकपाल कायद्यासाठी ऐतिहासिक आंदोलन झाले. ते जगभर गाजले. या आंदोलनामुळेच देशभर भ्रष्टाराविरोधात अभूतपूर्व जनजागृती झाली. त्यानंतरही पुढे पाच वर्षे हे आंदोलन सुरू होते. त्यातूनच देशातील जनतेला लोकपाल कायदा मिळाला.

हजारे यांनी केवळ आंदोलनेच केली नाहीत, तर त्याबरोबरीने लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी राज्यात आणि देशात सातत्याने दौरे करून जाहीर सभा घेतल्या. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता केवळ प्रत्येक सभेच्या ठिकाणी जनतेसमोर झोळी फिरवून लोकांच्याच आर्थिक मदतीने हे अभियान सुरू ठेवले. स्वतः घरदार सोडून मंदिरात राहणारा एक फकीर माणूस जनहितासाठी आपले प्राण पणाला लावतो, हे पाहून जनतेत चैतन्य निर्माण झाले. या जनआंदोलनांचा इतिहास भावी पिढीला कळावा, या उद्देशाने भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास व स्वामी विवेकानंद
कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून एक भव्य संग्रहालय आकारास येत असल्याची माहिती अशोक सब्बन व ठकाराम राऊत यांनी दिली.

हेही वाचा..

यापूर्वी ग्रामविकासाचे सचित्र संग्रहालय उभारलेले आहे. त्यास लाखो लोकांनी भेटी दिल्या आहेत. आता त्यात जनआंदोलन संग्रहालयाची भर पडणार आहे. त्यामुळे सामाजिक पर्यटनस्थळ म्हणून लौकिक असलेल्या राळेगणसिद्धीच्या वैभवात भर पडणार आहे. संग्रहालयास मूर्त स्वरूप देण्याचे काम संजय पठाडे यांनी, तर त्यांना कार्यालयीन मोलाचे सहकार्य स्वयंसेवक अन्सार शेख यांनी केले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com