जुगाऱ्याने केलेला खून पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून उघडकीस - Pimpri and Pune rural police uncover gambling murder | Politics Marathi News - Sarkarnama

जुगाऱ्याने केलेला खून पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून उघडकीस

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

चिंचवडमधील जुगारी मारेकरी व त्याच्या दिल्लीतील साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी आज न्यायालयाने दिली.

पिंपरी : क्रिकेटवरील बेटिंगमध्ये हरलेल्या वीस लाख रुपयांचा तगादा लावल्याने एका जुगाऱ्याने बेटिंगचालकाचाच खून केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण (पौड पोलिस ठाणे) पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून उघडकीस आला.

याप्रकरणी चिंचवडमधील जुगारी मारेकरी व त्याच्या दिल्लीतील साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी आज न्यायालयाने दिली.

हेही वाचा...सेवा संस्था होणार आॅनलाईन

हद्दीच्या वादातून पोलिस ठाणी एकमेकांकडे गुन्हे ढकलीत असताना शहर व ग्रामीण पोलिसांचे हे टीमवर्क आणि सुसंवाद यामुळे खूनासारखा हा गंभीर गुन्हा उघडकीस आला. त्यामुळे त्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन दिली.

सीडीआरचे विश्लेषण आणि सीसीटीव्ही फूटेज पाहून पोलिसांनी हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला.यात खून झालेला बेटिंगचालक विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०, रा. मोहननगर,चिंचवड) याला आरोपी जुगारी हर्षद अशोककुमार राठोड (वय २९, रा.निगडी,पिंपरी-चिंचवड) आणि त्याचा साथीदार महमंद इकलास महमंद इक्बाल इद्रिसी (वय २३, रा.दिल्ली) यांनी चिंचवडहून ९ मार्चला मोटारीतून पळवून नेले.

ताथवडेत म्हणजे शहराच्या हद्दीत त्याचा खून करून नंतर त्याचा मृतदेह पुणे ग्रामीणमधील पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द (ता. मुळशी,जि.पुणे) येथे टाकून दिले होते. १० तारखेला हा मृतदेह मिळालेल्या पौड पोलिसांनी त्याची ओळख,तर लगेच पटवली. शिवाय २४ तासाच्या आत तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांनी हर्षदला अटक केली. त्याने खूनाची कबूली देत तो का केला हे ही सांगितले.

हेही वाचा.. अर्सेनिकची परिणामकारिकता किती

तो विजयकडे क्रिकेटवर बेटिंग घेत होता. त्यातून तो त्याला १५ ते वीस लाख रुपये देणे लागत होता. त्यासाठी विजयने तगादा लावल्याने त्याने इद्रिसच्या मदतीने विजयचे अपहरण करून त्याचा खून केला होता.

दरम्यान, मयत हा आपल्या हद्दीतील असल्याने पिंपरी पोलिसांनीही या गुन्ह्याचा समांतर तपास केला होता. त्यांनी हर्षदने दिलेल्या माहितीच्या आधारे इद्रिसला काल निगडीत पकडले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख