परमबीरसिंहाच्या सनसनाटी आरोपांमुळे भाजपच्या हाती मिळाले आयतेच कोलीत

परमबीरसिंहाच्या लेटरबॉम्बमुळे विरोधी पक्ष भाजपच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असून, ते गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता रान उठवणार, यात शंकाच नाही.
परमबीरसिंहाच्या सनसनाटी आरोपांमुळे भाजपच्या हाती मिळाले आयतेच कोलीत
Parambirshing 1.jpg

पिंपरीः राज्य सरकारने नुकतीच उचलबांगडी केलेले मुंबईचे पोलिस आयुक्त व राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीरसिंह यांनी केलेल्या गंभीर व सनसनाटी आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामाच द्यावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

परमबीरसिंहाच्या लेटरबॉम्बमुळे विरोधी पक्ष भाजपच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असून, ते गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता रान उठवणार, यात शंकाच नाही.

ही ब्रेकिंग बातमी कळताच राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा,अशी मागणी सरकारनामाशी बोलताना केली. त्यांनी तो दिला नाही,तर मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा,असे ते म्हणाले. हे सरकारच खंडणीखोर असल्याचे याव्दारे स्पष्ट झाले असून त्यातून राज्याची देशभरात बदनामी झाल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला मला शंभर कोटी रुपये मिळाले पाहिजहे देशमुखांसारखा मंत्र्यांचे मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सांगणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,असे ते म्हणाले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अॅंटिलिया बंगल्याजवळ मिळून आलेल्या स्फोटक असलेल्या मोटारीप्रकरणी अटक केलेल्या एपीआय सचिन वाझेला व मुंबई पोलिस दलातील इतर दोन अधिकाऱ्यांना गृहमंत्री देशमुख यांनी महिना मुंबईतून शंभर कोटी रुपयांच्या हफ्त्याचे टार्गेट दिल्याचा  खळबळजनक आरोप परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आज केला आहे. मुंबईतील एक हजार ७५० बार आणि रेस्टॉंरंटकडून महिन्याला प्रत्येकी तीन लाख रुपये हफ्ता गोळा करण्यास वझे व सामाजिक सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलिस आय़ुक्त संजय पाटील आणि  उपायुक्त भुजबळ यांना गोळा करण्यास सांगण्यात आल्याचा दावा परमबीरसिंह यांनी केला आहे. त्याच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी एसीपी पाटील यांच्याबरोबर फोनवरून झालेले संभाषणच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले आहे. देशमुख यांना,तर आता राजीनामाच द्यावा लागेल,अशी स्थिती यामुळे निर्माण झाली आहे.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in