ग्रामसेवकास महिलेने चपलेने चोपले ! परस्परविरोधी गुन्हे, महिलेस अटक - Gramsevakas woman slapped! Conflicting crimes, women arrested | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामसेवकास महिलेने चपलेने चोपले ! परस्परविरोधी गुन्हे, महिलेस अटक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

कार्यालयात जात असताना संबंधित महिलेने शिवीगाळ करून गचांडी धरत चपलेने मारहाण केल्याचे ग्रामसेवकाने फिर्यादीत म्हटले आहे.

नेवासे : विनयभंग केल्याचा आरोप करून एका महिलेने आज शुक्रवारी सकाळी कुकाण्याच्या ग्रामसेवकाला शिवीगाळ करून चपलेने मारहाण केली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, महिलेस अटक केली आहे. 

ग्रामसेवक रमेश खंडेराव गायके (वय 53) यांनी नेवासे पोलिसांत फिर्यादीत दिली. कार्यालयात जात असताना संबंधित महिलेने शिवीगाळ करून गचांडी धरत चपलेने मारहाण केल्याचे ग्रामसेवकाने फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा... अर्सेनिक अल्बमची परिणामकारकता

याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटकही झाली आहे. तसेच, संबंधित महिलेनेही नेवासे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून या ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या घटनेचे चाैकशी व्हावी

"स्त्रियांचा सन्मान, हक्क अबाधित राहिलेच पाहिजेत. अन्याय झाला असेल तर तिने रीतसर दाद मागायला हवी होती. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, असे मत कुकाण्याचे सरपंच लता अभंग यांनी म्हटले आहे.

 

 

हेही वाचा...

मंत्री गडाखांकडून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य 

नेवासे : "ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्यासाठी दळणवळण वाढले पाहिजे. त्यासाठी तालुक्‍यातील रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्याला जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख यांनी प्राधान्य दिले आहे,'' असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले. 

हेही वाचा... सेवा संस्था होणार आॅनलाईन

चांदे (ता. नेवासे) जिल्हा परिषद गटातील विविध गावांत मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन गडाख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. माजी सभापती कारभारी जावळे, अनिल अडसुरे, जिल्हा परिषद सदस्य सविता अडसुरे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, बाळासाहेब सोनवणे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, बाबूराव चौधरी, अण्णासाहेब केदार, सरपंच सिमोन जाधव, बाळासाहेब गायके, अश्रूबा सानप, राजेंद्र पालवे, पाचुंद्याचे सरपंच कारभारी टकले, दत्तात्रय काळे, उपसरपंच सचिन घोडेचोर, बबन पिसोटे, राजेंद्र उगले आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोजक्‍याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रारंभी महालक्ष्मी हिवरे व पाचुंदे येथील पूर्ण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण व देवसडे ते गणोरे वस्ती रस्ताकामाचा प्रारंभ गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख