भाजपच्या इशाऱ्यावर परमबीर सिंहांचा मंत्र्यांना फसविण्याचा प्रयत्न : नवाब मलिक

परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.
Sarkarnama (80).jpg
Sarkarnama (80).jpg

मुंबई : अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करीत आहे. या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे.  यातून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

नवाब मलिक  Nawab Malik म्हणाले की, एनआयएच्या आरोपपत्रात सचिन वाझेला मुख्य आरोपी बनविण्यात आले होते. आम्ही सुरवातीच्या दिवसापासून सांगत आहोत की माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. 

नवाब मलिक म्हणाले, ''परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि अन्य जणांना अंधारात ठेवून त्यांनी सचिन वाझेची भेट घेतली होती. परमबीर सिंह यांनी भाजपच्या इशाऱ्यावर मंत्र्यांना फसविण्याचा प्रयत्न केला आहे.  तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमबीरसिंग यांनी भाजपसोबत  'डील' केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

मनोहरमामांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत बारामतीत गुन्हा दाखल 
NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या 'डील' मुळे NIA ने परमबीरसिंग यांना आरोपी केलेले नाही, असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र, आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत, हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.


सचिन वाझेने मुख्यमंत्र्यापासून सत्य लपविलं! 
मुंबई : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविला आहे. या जबाबात महत्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav-thackerayयांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, निंलबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com