सचिन वाझेने मुख्यमंत्र्यांपासून सत्य लपविलं! 

मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
Sarkarnama (77).jpg
Sarkarnama (77).jpg

मुंबई : अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करीत आहे. या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविला आहे. या जबाबात महत्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav-thackerayयांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, निंलबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 

मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर ५ मार्चला या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवले होते. यावेळी ठाकरे यांनी  या घटनेमागे काही अतिरेक्यांचा हात आहे का ? असे विचारले असता सचिन वाझे यांनी सांगितले की, अँटिलिया घटनेमागे कोणतेही दहशतवादी षडयंत्र नाही. याशिवाय, मनसुखचा मृत्यू आत्महत्या आहे, असे वाटते. पण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो ते पाहिले पाहिजे.

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
मनसुख हिरेन ज्या दिवशी बेपत्ता त्या दिवशी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह याच्या केबिनमध्ये माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे उपस्थित होते. वाझेनेच मनसुख हिरेन बेपत्ता झाल्याची आणि त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे आढल्याची बातमी प्रथम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी आयुक्तांच्या केबिनमध्ये पोहचण्यापूर्वीच वाझे थेट आयुक्तांना ही माहिती सांगण्यासाठी गेला. त्यावेळ निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही तेथे उपस्थित होता. या माहितीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेले असता  प्रदीप शर्मा हे आयुक्तांच्या केबिनमधून बाहेर पडत होते.

''आम्ही दहशतवाद्यांचा कट नाकारू शकत नाही. तसेच मनसुखच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टममध्येच स्पष्ट होईल. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे आणि जयजीत सिंह यांना या प्रकरणाच्या अपडेट्सची माहिती देण्यास सांगितले. सुमारे 40 मिनिटांच्या बैठकीनंतर प्रत्येकजण निघून गेला. त्यानंतर वाझे यांनी मला सांगितले की त्यांना सीपींना कळवायचे आहे, यानंतर वाझे सुमारे अर्धा तास बोलले आणि नंतर प्रत्येकजण आपापल्या घरी गेले,'' असे तत्कालीन एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com