मनोहरमामांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत बारामतीत गुन्हा दाखल 

बाभळीचा पाला, साखर, भंडारा माझ्या आजारी वडीलांना खाण्यास दिला
manohar mama.jpg
manohar mama.jpg

माळेगाव :  बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली, हा फसवणूकीचा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात Shashikant Kharat ( वय 23, व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान,  रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली. 

त्यानुसार आज पोलिसांनी निर्णायक भूमिका घेत मनोहर मामा भोसले  manohar mama (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) , विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहर मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध  कारवाई केली. 

शशिकांत खरात यांनी फिर्यादीमध्ये वरील आरोपींविरुद्ध गंभीर तक्रार केल्याचे स्पष्ट झाले आहे. `` मागिल तीन वर्षापासून मनोहर भोसले याने मी बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासविले. तुझ्या वडिलांचा गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे त्याने सांगितले. तसेच बाभळीचा पाला, साखर, भंडारा माझ्या आजारी वडीलांना खाण्यास दिला व विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार  शिंदे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासोबत संगणमत करून मनोहरमामा याने वेळोवेळी दोन लाख 51 हजार पाचशे रुपये घेतले. हे पैसे न दिल्यास माझ्या वडिलांना जीविताची भीती त्यांनी घातली.  हे पैसे परत मागितल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली,`` अशी तक्रार खरात यांनी फिर्य़ादिमध्ये नमूद केली आहे. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे वरिल प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संबंधित आरोपींना अद्याप अटक झाली नसून लवकरच संबंधित आरोपींना पकडून सदर प्रकरणातील तपासाची दिशा स्पष्ट केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई :  केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने Central Narcotics Department कुख्यात डाँन दाऊद इब्राहिमच्या Dawood Ibrahimहस्तकाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. एनसीबीने NCB त्याच्याकडून १० लाखा़चे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणातील 3 गुन्ह्यात तो फरार होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com