मराठी माणसालाच भाजप परप्रांतीय ठरवेल ; "अंबानी, अदानींना म्हणण्याचे धाडस नाही

“नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला.
Sanjay Raut.jpg
Sanjay Raut.jpg

मुंबई :  ''ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला आणि साकीनाका बलात्काराच्या निमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी 'सामना'च्या 'रोखठोक"मधून परप्रांतीयांबाबत भाष्य केलं आहे. 

“नक्की परप्रांतीय कोण? हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला. ठाकरे यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे किंवा भाषिकांचे नाव घेतले नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत,” असं संजय राऊत म्हणाले यांनी म्हटलं आहे.  ''भाजपाचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील! त्यांचे वागणे, बोलणे व डोलणे तसेच दिसत आहे,'' असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

श्री श्री रविशंकर यांच्याशी संवादाची येत्या मंगळवारी संधी 
''मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व येथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप ‘परप्रांतीय प्रेमा’चे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही,” असे राऊतांनी 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे.  

चंद्रकांतदादा म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय''  
“मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत.

शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱयाच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ानपिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. 

''अंबानी, अदानी, हिरानंदानी, रहेजा, कुकरेजा वगैरेंना कोणी ‘बाहेरचे’ म्हणणार नाही. राजकारण्यांत ते धाडसही नाही. मुंबईसारख्या शहरातले अनेक उद्योग व उद्योगांची कार्यालये बाहेर गेली. हेसुद्धा मुंबईवर आक्रमण करण्याचे परप्रांतीय उद्योग आहेत, अशी वेदना कोणाला होत नाही. जेट एअरवेज ही विमान कंपनी आता पुन्हा सुरू होत आहे. या कंपनीचे मुख्यालय आधी मुंबईत होते, ते आता दिल्लीजवळच्या गुडगावला नेले. आंदोलन यासाठी व्हायला हवे, पण येथे अनेकांचे इंटरेस्ट गुंतल्याने सगळेच चूप राहतात,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com