चंद्रकांतदादा म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय,''

चंद्रकांत पाटलांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
4patil_32.jpg
4patil_32.jpg

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ''मला माजी मंत्री म्हणून नका, या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांच्या या विधानाने राज्याच्या राजकाराणात नवी चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांतदादांनी त्यांच्या त्या विधानाबाबत आज पुण्यात स्पष्टीकरणही दिलं आहे. चंद्रकांत पाटलांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. 

''मला माजी मंत्री म्हणून नका, येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल, असं विधान त्यांना केल्यानंतर त्यांची नागालॅंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही विधान केलं होते.  

अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे 
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या  वक्तव्याची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. चंद्रकात पाटील आणखी पंचवीस वर्ष तरी माजी मंत्री म्हणूनच राहणार आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय, असा टोला संजय राऊत यांनी काल लगावला. चंद्रकांत पाटील येत्या दोन दिवसात बोलले होते, त्यातले 24 तास संपले आहेत, आणखी 24 तास राहिले आहेत, वाट पहा, तीन  पैकी एक पक्षात प्रवेश करु असं चंद्रकांत पाटील यांना वाटत असावं, म्हणून ते माजी राहणार नाही, असं म्हटले असतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

''माझ्या कानावर असं आलं आहे की चंद्रकांत पाटील यांना नागालँडचे राज्यपाल म्हणून विचारणा करण्यात आली आहे. नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छाच'' असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे. याला चंद्रकातं पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय तर कोण केंद्रीय मंत्री करतंय, मला खूप बरं वाटतंय,''

'मला माजी मंत्री म्हणू नका,' चंद्रकांतदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले,...
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी एका कार्यक्रमात ''मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन दिवसांत काय होईल, ते तुम्हाला दिसेल,’ असे विधान नुकतेच केले होते. ते देहु येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे विधान केलं होते. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यावर पाटलांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com