4patil_32.jpg
4patil_32.jpg

'मला माजी मंत्री म्हणू नका,' चंद्रकांतदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले,...

चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी एका कार्यक्रमात ''मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन दिवसांत काय होईल, ते तुम्हाला दिसेल,’ असे विधान नुकतेच केले होते. देहु येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे विधान केलं होते. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यावर पाटलांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ''देहु येथील कार्यक्रमात ''मला माजी मंत्री म्हणू नका,''असे मी विधान केलं होतं या विधानाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला. ''मला माजी मंत्री म्हणू नका,'' हे विधान मी देहु परिसरातील एका स्थानिक नेत्याबाबत केलं होतं,"

चंद्रकात पाटलांच्या या विधानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काल माध्यमांच्या प्रतिनिधी विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील, तर मला माहीत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत असेल. मी विकास कामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यावर सध्या कोरोनाचे सावट आहे. याबाबत खबरदारी घेत विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे.’

पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत
 
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ही स्थिती होती. याचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसलेला होता. जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यानुसार आठशे कोटीचे नुकसान नोंदले गेले होते. नुकसानीसाठी मदत देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com