श्री श्री रविशंकर यांच्याशी संवादाची येत्या मंगळवारी संधी

देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक २१ सप्टेंबर रोजी 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन'सोबत प्रकाशित होत आहे.
WhatsApp Image 2021-09-19 at 1.15.06 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-19 at 1.15.06 PM.jpeg

पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांच्याशी संवादाची संधी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० वाजता मिळणार आहे. जीवनात शांती, मैत्री आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण मानवतेचा दृष्टीकोन अंगिकारून स्वतःमध्ये कशाप्रकारे बदल घडवू शकतो, याबद्दल श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत. 

भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या देशी गाईला रोजच्या जगण्यात महत्वाचे स्थान कसे देता येईल, याबद्दलही रविशंकर संवाद साधणार आहेत.  सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार  (Abhijit Pawar) त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांच्या प्रश्नांनाही श्री श्री रविशंकर उत्तरे देतील. 

हेही वाचा : चंद्रकांतदादा म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय''  
हा कार्यक्रम झूम कॉलद्वारे होणार आहे. याशिवाय  'सकाळ'च्या फेसबूक (facebook.com/SakalNews) पेजवर आणि युट्यूब चॅनेलवरही (youtube.com/c/SakalMediaGroup) या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.   

भारतीय देशी गायींच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी सकाळ माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक २१ सप्टेंबर रोजी 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन'सोबत प्रकाशित होत आहे. या विशेषांकात श्री श्री रविशंकर यांच्यासह तज्ज्ञ, संशोधकांचे लेख आणि देशी गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर यशस्वी उद्योग उभ्या करणाऱ्यांच्या यशकथांचा समावेश आहे.  श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची बंगळूरजवळ गोशाला आहे. ही गोशाला देशातील सर्वोत्तम मानली जाते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com