कोरोनात जन्मलेला 'मसीहा' सोनू सूद पूरपरिस्थितीत गायब ; ठाकरेंचा सवाल

शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर टीका केली आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-03T140020.449.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-03T140020.449.jpg

पुणे : अतिवृष्टीमुळे पुर आणि दरड कोसळल्यामुळे चिपळूण (chiplun) शहर उध्वस्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात जीवीतहानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कोकणचा पाहणी दौरा केला. पुरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात पुढे सरकावले. पण कोरोना काळात मदत करणारा अभिनता सोनू सूद याने पुरग्रस्तांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) यांनी सोनू सूदवर टीका केली आहे. याबाबत ठाकरे यांनी टि्वट करीत सोनू सूदवर निशाणा साधला आहे.   

आपल्या टि्वटमध्ये शालिनी ठाकरे म्हणतात, ''कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?''

मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो!
चिपळूणच्या पाहणी दैाऱ्यात मुख्यमंत्री पूरग्रस्तांचे म्हणणे शांतपण ऐकूण घेत होते. त्यावेळी ‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, आमदार - खासदारांचे दोन महीन्यांचे पगार रद्द करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’' असे एक महिला मुख्यमंत्र्यांना सांगत होती. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव   हे त्या महिलेला म्हणाले की, “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,”अशी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधीच्या भेटीमागचे कारण संजय राऊतांनी सांगितले!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील भास्कर जाधवांवर कडाडून टीका केली आहे. “भास्कर जाधव, त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी भास्कर जाधवांना दिला होता.

बुलढाणा : सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर पहारा देणारा चिखली येथील एक लष्करी जवानाला वीरमरण आले आहे. एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी परत येत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने तो खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com