चिखली येथील लष्करी जवान कैलास पवार यांना सियाचिनमध्ये वीरमरण 

बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने तो खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.
चिखली येथील लष्करी जवान कैलास पवार यांना सियाचिनमध्ये वीरमरण 

बुलढाणा : सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर पहारा देणारा चिखली येथील एक लष्करी जवानाला वीरमरण आले आहे. एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी परत येत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने तो खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला.

कैलास पवार Kailas Pawar असे या जवानाचे नाव आहे. यांच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर उद्या (ता. ४) चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  
  
हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अशा भयानक थंडीमध्ये देखील जवान डोळ्यात तेल घालून चीनी आणि पाकिस्तानी कारवायांवर नजर ठेवून असतात. वेळप्रसंगी ते युध्दास देखील तयार असतात. अशा दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हा गेल्या २ ऑगस्ट २०२० पासून 10 - महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होता. त्याची सियाचीनमधील एक वर्षाची ड्यूटी १ ऑगस्टला संपली. आता तो सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येणार होता. आपल्या सहकार्यासह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होता. 

राहुल गांधीच्या भेटीमागचे कारण संजय राऊतांनी सांगितले!
सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलासचा पाय घसरला आणि तो बर्फावरुन  घरंगळत खाली कोसळला. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्याला तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान  १ ऑगस्ट रोजी कैलास पवारची प्राणज्योत मालवली. कैलासच्या अशा अनपेक्षित जाण्याने पवार कुटुंबावर दु:खाचा हिमालयच कोसळलाय. त्याच्या निधनाची वृत्त ऐकून घरातील मंडळी, नातलग आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत 

'आमचा सीएम जगात भारी ; शिवपंख लावून द्या' मनसेचा टोमणा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे पुन्हा एकदा मुंबई लोकल सुरु करण्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खोचक टि्वट करुन देशपांडे यांनी सर्वसामान्यांच्या लोकल प्रवाशाबाबत चिमटे काढले आहेत. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in