राहुल गांधीच्या भेटीमागचे कारण संजय राऊतांनी सांगितले!

संजय राऊत व राहुल गांधी या दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली.
राहुल गांधीच्या भेटीमागचे कारण संजय राऊतांनी सांगितले!
4Gandhi_20Raut.jpg

नवी दिल्ली  : शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी टि्वट करुन कॉग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये सव्वा तास चर्चा झाली आहे. राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी बैठक झाल्यानंतर सांगितले आहे.या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसनं स्वतंत्र लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यताआहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.  

'आमचा सीएम जगात भारी ; शिवपंख लावून द्या' मनसेचा टोमणा
“खासदार राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले” अशी माहिती संजय राऊत यांनी टि्वट करुन दिली आहे.

माजी मंत्री सहाव्या निकाहाच्या तयारीत ; तिसऱ्या पत्नीची पोलिस ठाण्यात धाव
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट खासदार संजय राऊत यांनी घेतली. ''राज्यातील पुरपरिस्थितीच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा. मदत निधी तातडीने मंजूर करावा,'' या मागण्या अर्थमंत्र्यांकडे राऊतांनी केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे, खासदार फौजिया खान आदी उपस्थित होते.
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in