मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो!

ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरं सुरु करा
Sarkarnama Banner - 2021-08-03T121458.924.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-03T121458.924.jpg

मुंबई : राज्यातील दुकांनांच्या वेळा (Shop timings) रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले.  रुग्ण वाढ कमी होत नाही त्या ठिकाणी दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील तर इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

या पार्श्वभूमीवर 'मंदीरे खुले करा,' असे सांगत भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar bhosale) यांनी महाविकास सरकारवर टीका केली आहे. राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारला जातो, असा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे.  

''सरकारने विविध ठिकाणी निर्बंधामध्ये शिथीलता आणली आहे. सगळं काही आता नियम अटींनुसार सुरु झालं आहे. मग आता मंदिरंही बंद नकोत. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरं सुरु करा,'' अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली.

'आमचा सीएम जगात भारी ; शिवपंख लावून द्या' मनसेचा टोमणा
''लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. म्हणून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की किमान लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा आणि मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांना जगू द्या. लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा, असे भोसले म्हणाले. 
जेव्हा जेव्हा नवी नियमावली तयार होते तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरांवर बंदी कायम केली जाते, असा आरोप भोसले यांनी केला आहे.   

चिखली येथील लष्करी जवान कैलास पवार यांना सियाचिनमध्ये वीरमरण
बुलढाणा : सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर पहारा देणारा चिखली येथील एक लष्करी जवानाला वीरमरण आले आहे. एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी परत येत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने तो खाली कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. कैलास पवार यांच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर उद्या (ता. ४) चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com