रोहितजी, MPSC विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका!

आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-04T104236.952.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-04T104236.952.jpg

पुणे : मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच रखडलेल्या परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि त्याच्या पालकाना सतावत आहे. काही दिवसापूर्वी  पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. पण अद्याप या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करीत अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत, असे सांगितले होते. त्यावर माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. 

तीन दिवसापूर्वी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सदस्यांची यादी पाठवली आहे. याबाबतचे टि्वट आमदार रोहित पवार यांनी केले होत. रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, दादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.

अजित पवारांचा विरोध असतानाही एकनाथ शिंदेंनी मोहिते पाटलांना केलं खुश
सदाभाऊ खोत यांनी टि्वट करीत रोहित पवारांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करु नका, असे सांगितले आहे. ''आमदार रोहित पवारजी, आपल्या पवार घराण्याने दिलेला शब्द खरच पाळते का हे महाराष्ट्र जाणतोच आहे, #MPSC सदस्यांच्या संदर्भातील वकीलपञ तुम्ही जरूर घ्या, पण खोटे युक्तिवाद करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका,'' असं टि्वट खोत यांनी केलं आहे. 

व्वा! मोदीजी व्वा! तुमच्या राज्यात खासदारपण गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत!
राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ता. ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवारांनी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या 'वाझे' ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.    
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com