व्वा! मोदीजी व्वा! तुमच्या राज्यात खासदारपण चूल वापरायला लागले आहेत!

रुपाली चाकणकरयांनी नवनीत राणा यांना खोचक टोला लगावला आहे.
0rupali26.jpg
0rupali26.jpg

पुणे  : खासदार नवनीत राणा  Navneet Rana,या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या मतदार संघातील पाहणी, विविध कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ त्या नेहमीत सोशल मीडियावर शेअर करीत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्या व्हिडिओवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी खोचक टोला लगावला आहे. 

नवनीत राणा  या चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचा हा व्हिडिओ आहे. रुपाली चाकणकर यांनी टि्वट करुन नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात की, “गॅस महाग झाल्यामुळे नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!

कवी महानोरांचा गणपतरावांच्या आठवणींना उजाळा : भ्रष्टाचाराची सावलीही न पडलेला नेता
नवनीत राणा यांनी अंजनगावाला भेट दिली. येथील मुक्कामादरम्यान त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला.  त्यांचा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यावर चाकणकर यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या बाजूने तर काहीनी राणा यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

पुणे : अतिवृष्टीमुळे पुर आणि दरड कोसळल्यामुळे चिपळूण शहर उध्वस्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात जीवीतहानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कोकणचा पाहणी दौरा केला. पुरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात पुढे सरकावले. पण कोरोना काळात मदत करणारा अभिनता सोनू सूद याने पुरग्रस्तांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही.  यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर टीका केली आहे. याबाबत ठाकरे यांनी टि्वट करीत सोनू सूदवर निशाणा साधला आहे.   
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com