देशमुख प्रकरण : CBI करणार NIA कस्टडीतच वाझेची चौकशी - Letter Bomb NIA court allows CBI to interrogate Sachin Waze in NIA custody | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुख प्रकरण : CBI करणार NIA कस्टडीतच वाझेची चौकशी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या लेटरबाँबनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा आदेश सीबीआयला (CBI) दिला आहे. त्यानुसार सीबीआयने आज या प्रकरणात सचिन वाझेच्या चौकशीसाठी एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असून एनआयए कस्टडीतच वाझेची चौकशी केली जाणार आहे.

सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआयने (CBI) प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील यांनी न्यायालयात देशमुख तसेच वाझे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. सीबीआयने येत्या १५ दिवसांत चौकशी करुन न्यायालयाला अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

हेही वाचा : लस देता का लस! राज्यात तुटवडा अन् केंद्राकडून कासवगतीने पुरवठा

या आदेशानुसार सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात निलंबित पोलिस अधिकारी व सध्या एनआयएच्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेचा उल्लेख केला आहे. वाझे याच्यामार्फतच 100 कोटी रुपयांचा वसुली करण्याबाबतचा दावा पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयकडून पहिल्यांदा वाझेची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी आज वाझेच्या चौकशीच्या मागणीसाठी एनआयए न्यायालयात सीबीआयकडून अर्ज करण्यात आला होता.

न्यायालयाने एनआयए कस्टडीतच वाझेची चौकशी करण्याची परवानगी सीबीआय़ला दिली आहे. त्याबाबतच्या वेळा एनआयएला कळविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता सीबीआयला दोन दिवसांत वाझेची चौकशी पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाने आज वाझेची कोठडी 9 एप्रिलपर्यंत वाढविली. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक शिंदे व नरेश गौर यांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा : शहीद जवानांविषयी वादग्रस्त पोस्ट भोवली; लेखिकेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वाझेच्या खात्यात आले दीड कोटी

दुसऱ्या रिमांडनंतर सचिन वाझेच्या कंपनीच्या  खात्यात 1.51 कोटी आले आहेत. एनआयएने एक बाईकही जप्त केली आहे. वाझेच्या एका सहकाऱ्याने त्याला 36 लाख आणि 40 लाख रुपये आले असल्याचे सांगितले आहे. सचिन वीजेच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आढळून आले आहे. या पैशांचा उपयोग गुन्ह्यात झाला असल्याचा संशय एनआयएला आहे. एका API कडे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले कुठून याचा तपास करण्यासाठी एनआयएने वाझेची कोठडी मागितली आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख