आव्हाडांकडून गावस्करांना 'गुगली', म्हणाले, गावस्कर नसते तर..

त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला.
Sarkarnama - 2021-09-16T162255.629.jpg
Sarkarnama - 2021-09-16T162255.629.jpg

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "गावस्कर नसते तर आपण म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता,'' असं सांगत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आव्हाडांनी टि्वट करीत टीकास्त्र सोडलं आहे.  

मुंबईत बांद्रातील रंगशारदा सभागृहाच्या येथील २१ हजार ३४८ चौ.फू भूखंड सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इनडोअर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी ३१ वर्षांपुर्वी दिला होता. परंतु या भूखंडावर अद्याप बांधकाम करण्यात आलेलं नाही. यामुळे डिसेंबर महिन्यात हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा करुन आव्हाड यांनी हा प्लॉट गावस्कर ट्रस्टकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचा धक्का ; भाजप संलग्न अपक्ष नगरसेवकांच्या गटनेत्याला घेतले पक्षात
आपल्या टि्वटमध्ये आव्हाड म्हणतात की, जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो. 

पुणे जिल्ह्यातील या बड्या नेत्याला व्हायचं होत अभिनेता...
पुणे :  सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना अनेक नेते आपले छंद जोपासतात पण अनेकांना आपल्या मनाला  मुरड घालावी लागते. पण ती खंत मात्र सर्वांनाच सतावते. आणि मग अशा गप्पांमधून आपले नेते ती बोलून दाखवतात. पुणे जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांनी आपल्या अनोख्या छंदाविषयी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com